फॅशन स्टायलिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या करिअरमध्ये आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची आणि उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती..
फॅशन स्टायलिस्ट आपल्या ग्राहकांचे ब्रँडिंग करण्याचे काम करतात. या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी काम करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. म्युझिक व्हिडीओ, जाहिराती, टीव्ही लाइव्ह शो, रिअ‍ॅलिटी शो, चित्रपट आदी क्षेत्रांत फॅशन स्टायलिस्ट करिअर करू शकतात. आपल्या ग्राहकांच्या सकारात्मक बाबींना उत्तम पद्धतीने सामोरे आणणे फॅशन स्टायलिस्ट्सकडून अपेक्षित असते. उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रसंगानुरूप वेशभूषा-केशभूषा ते अलंकारांची निवड करण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी करणे अपेक्षित आहे.
फॅशन स्टायलिस्ट्ना आपल्या ग्राहकांच्या इमेज ब्रँडिंगगसाठी समकालीन फॅशन ट्रेंड्स आणि फॅशन उद्योगाविषयी उत्तम माहिती असणे आवश्यक ठरते. फॅशन स्टायलिस्ट्सना डिझायनर्स, टेलर्स, मॉडेल्स, फोटोग्राफर, हेअर आणि मेकअप आर्टस्टि, रिटेलर्स, माध्यमे, सेलिब्रेटीज, प्रसिद्धीयंत्रणा यांच्यासोबत समन्वयाने काम करावे लागते. ग्राहकांच्या प्रतिमेशी सुसंगत फॅशन अ‍ॅक्सेसरीजच्या गरजा आणि पेहरावाच्या निर्मितीसाठी योग्य वस्त्रप्रावरणांचा शोध घ्यावा लागतो. जगभरातील नव्या फॅशनच्या वस्त्रप्रावरणांवर लक्ष ठेवून योग्यवेळी त्याचा अचूक वापर करता येण्याचे कौशल्य प्राप्त करावे लागते. ग्राहकांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होण्याकरता फॅशन स्टायलिस्ट्सना फॅशन ट्रेंडची पूर्वकल्पना असणे आवश्यक आहे. त्याला रंगसंगती, कला, डिझाइनचे ज्ञान आवश्यक ठरते. विविध प्रकारची देहयष्टी, चेहरे यांचा अभ्यास आणि त्यानुसार वस्त्रप्रावरणांची निर्मिती, मार्केटिंग, नेटवìकग, जाहिरात यांसारखे व्यावसायिक कौशल्य फॅशन स्टायलिस्ट्सना आवश्यक ठरते.

करिअरच्या संधी
*  व्हिडीओ/कमर्शिअल स्टायिलग- विविध प्रकारच्या जाहिराती, औद्योगिक आणि शैक्षणिक चित्रफिती, छोटय़ा चित्रफिती यांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या/ मॉडेल्सच्या पेहरावांची निश्चिती, त्या अनुषगांने डिझाइन, प्रत्यक्ष पेहरावासाठी लागणाऱ्या कापडाची निवड आणि निर्मिती या बाबींकडे लक्ष पुरवावे लागते.
*  सेलिब्रेटी स्टायिलग/ कॉर्पोरेट स्टायिलग- मोठय़ा कॉर्पोरेट्सना संस्थेच्या गणवेशाबाबत सल्ला देणे, कर्मचारी/ अधिकारी यांच्या व्यक्तिगत सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करणे या अनुषंगाने माहितीपुस्तिका, पुस्तकनिर्मिती आदी कामे करावी लागतात.
*  शो स्टायिलग- जाहीर कार्यक्रमांचे आयोजन, मॉडेल्सची निवड, सहभागी कलावंतांचे पेहराव आणि इतर आभूषणांची निवड, छायाचित्रकार/ व्हिडीओ फोटोग्राफरची निवड, कार्यक्रम संकल्पनेची निश्चिती आणि त्याबरहुकूम कार्यक्रम निर्मिती याकडे लक्ष पुरवावे लागते.
*  फोटो स्टायिलग- सेलिब्रेटी आणि मॉडेल्सचे फोटो शूटिंग व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी फोटो स्टायलिस्ट साहाय्य करतात.
*  कॅटलॉग स्टायिलग- फॅशन उद्योगाशी निगडित विविध वस्तू प्रभावीरीत्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलात्मक कॅटलॉगची निर्मिती करण्याचे काम फॅशन स्टायलिस्ट करतात.
*  वॉर्डरोब स्टायिलग- चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, नाटय़निर्मिती यासाठी शेकडो पात्रांचे पेहराव, अलंकार डिझाइन करणाऱ्या कॉस्च्युम डायरेक्टरच्या किंवा डिझायनरच्या मार्गदर्शनाखाली फॅशन स्टायलिस्ट्सना काम करावे लागते.
फॅशन परेड स्टायिलग- फॅशन वीकमधील फॅशन परेडमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटी आणि मॉडेल्सच्या पेहरावांच्या स्टायिलगचे काम फॅशन स्टायलिस्ट्सना करावे लागते. ल्लएडिटोरियल स्टायिलग- फॅशन मासिके तसेच ग्लॅमर-फॅशन पुरवण्यांचे संयोजन, त्यासाठी मॉडेलची निवड, त्यांची विषयानुरूप छायाचित्रे, त्यासाठी वस्त्रप्रावरणे, आभूषणांची शोधनिर्मिती याकडे लक्ष पुरवावे लागते.
*  र्मचटायजिंग स्टायिलग- मॉल्समधील रिटेल दुकानांमधील वस्तूंची प्रभावी मांडणी व सजावट करण्याचे काम या स्टायलिस्ट्सना करावे लागते.

फॅशन स्टायिलग अभ्यासक्रम
हा अभ्यासक्रम पुढील संस्थांनी सुरू केला आहे –
पर्ल अ‍ॅकॅडमी- स्टायिलग अ‍ॅण्ड इमेज डिझाइन अभ्यासक्रम. कालावधी- चार वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५५ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई आणि दिल्ली कॅम्पसमध्ये शिकता येतो. संपर्क- १. एस. एम. सेंटर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ मेट्रो स्टेशनच्या बाजूला, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९, २. नारायण इंडस्ट्रिअल एरिया, फेज टू, शादिपूर मेट्रो स्टेशन, दिल्ली- ११००२८.
संकेतस्थळ- pearlacademy.com
ई-मेल – counsellor@pearlacademy.com

एफएडी-इंटरनॅशनल- डिप्लोमा इन फॅशन स्टायिलग (एक वर्ष), सर्टििफकेट इन फॅशन स्टायिलग (दोन महिने), ऑनलाइन अभ्यासक्रम. (६ आणि ९ महिने) संपर्क : १. एफएडी कॅम्पस-प्लॉट नंबर ३ आणि ४, वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क विस्तार, पुणे- ४११००१, २. एफएडी कॅम्पस, दुसरा आणि तिसरा मजला, लॅण्डमार्क बिल्डिंग, पाली नाका, वांद्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५०.
संकेतस्थळ- http://www.fadacademy.com
ई-मेल- fad@fadacademy.com

क्यू सी स्टाइल अ‍ॅकॅडमी- या संस्थेने ऑनलाइन फॅशन स्टायिलग अभ्यासक्रम सुरू केला आहे.
संकेतस्थळ- http://www.qcstyleacademy.com

मॉड आर्ट- डिप्लोमा इन फॅशन स्टायिलग अ‍ॅण्ड इमेज डिझाइन. संपर्क- सुभाष रोड, विलेपाल्रे (पूर्व),
मुंबई- ४०००५७. संकेतस्थळ- http://www.modart-india.com
ई-मेल – mumbai@modart-india.com

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- या संस्थेने डिप्लोमा इन फॅशन फिट अ‍ॅण्ड स्टाइल सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे.
अर्हता- बारावी. संपर्क- एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर- ४, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०.
संकेतस्थळ – http://www.nift.ac.in/mumbai
ई-मेल – nift.mumbai@nift.ac.in
शैक्षणिक पाठय़वृत्ती
धीरुभाई अंबानी इन्स्टिटय़ूूट ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स या संस्थेतून एम.टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ९५०० रुपये आणि पीएच.डी. अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा २४ हजार रुपये शैक्षणिक पाठय़वृत्ती दिली जाते. एम.टेक (इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमास GATE ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. पीएच.डी.च्या प्रवेशासाठी संस्थेच्या चाळणी परीक्षेतील गुण किंवा GATE किंवा युनिव्हर्सटिी ग्रँट कमिशन- नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (UGC-NET) किंवा जॉइंट एन्ट्रन्स सिलेक्स टेस्ट (JEST) यांपकी कोणत्याही एका परीक्षेतील सुयोग्य गुण आणि मुलाखत. संपर्क- धीरुभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स,
इंद्रोदा सर्कल, गांधीनगर, गुजरात- ३८२००७.
संकेतस्थळ- http://www.daiict.ac.in

Story img Loader