वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअर संधींचा वेध..

जगात सर्वत्र आíथक घडामोडी मोठय़ा प्रमाणावर घडत असतात किंबहुना बहुतेक घडामोडींचे केंद्र हे अर्थकारणच असते. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
A viral video of a young woman selling pani puri
“१५ -२० सेकंदांची रील आमचे कष्ट दाखवत नाही” पाणी पुरी विकणाऱ्या तरुणीने मांडली व्यथा, VIDEO होतोय व्हायरल
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना व्यापार, व्यवसाय, बाजारातील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, सरकारची वित्तीय धोरणे, औद्योगिक धोरण, शेअर मार्केट आदी बाबींचे ज्ञान प्राप्त होते. बारावीनंतर इच्छुकउमेदवार बी.कॉम आणि त्यानंतर एम.कॉम करू शकतो. या दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा वित्त, व्यवसाय प्रशासन, लेखा, ई-कॉमर्स, विक्री, विपणन आदी विषयांचा अभ्यास होतो.

बारावीनंतर वित्त, विमा, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी,  परदेशी व्यापार, स्टॉक ब्रोकिंग अ‍ॅण्ड इव्हेन्स्टमेंट अ‍ॅनॅलिस्ट यांसारखे अभ्यासक्रम करता येतात. गेल्या काही वर्षांत बॅचलर इन अकाउंटन्सी अ‍ॅण्ड फायनान्स, बॅचलर इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स असे वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरू केले आहेत. बिझनेस इकॉनॉमिक्स, फायनान्स अ‍ॅण्ड कंट्रोल या विषयातही पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येऊ शकते.

वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना अध्यापन, नागरी सेवा, उच्च शिक्षण, बँकिंग क्षेत्र, ब्रोकिंग, संशोधन, विमा क्षेत्र, वित्तीय संस्था, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्ट अशा काही संधी मिळू शकतात. बी.कॉम. आणि एमबीए अशा पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट्स या ठिकाणी उत्तम संधी मिळू शकते. जो उमेदवार संख्याशास्त्रावर प्रभुत्व मिळवतो त्यास वित्तीय अभियांत्रिकी (फायनान्शिअल इंजिनीअिरग) या उच्च श्रेणीच्या व आव्हानात्मक कार्य क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घटकांमध्ये बँक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंचर कॅपिटल, विमा, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट यामध्ये सातत्याने नव्या बाबी घडत आहेत. त्याचाही लाभ वाणिज्य शाखेतील प्रशिक्षित उमेदवार घेऊ शकतात.

जागतिकीकरणानंतर जगभरातील बँका आणि विमा कंपन्यांनी आपले जाळे सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केल्याने या कंपन्यांना तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते आहे. यामुळे वाणिज्य शाखेची पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना करिअर घडवण्याचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

एमबीए (फायनान्स) हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक आणि व्यापारी उलाढालीचे उत्तम ज्ञान वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले असल्याने त्यांना ई-कॉमर्स क्षेत्रातही चांगली कामगिरी करता येऊ शकते.

करिअर संधी :

अकाउंटन्ट, फायनान्स कंट्रोलर, अकाउंटन्ट एक्झिक्युटिव्ह, चार्टर्ड अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, फायनान्स अ‍ॅनॅलिस्ट, फायनान्स कंट्रोलर, फायनान्स मॅनेजर, फायनान्स कन्सल्टंट, इनव्हेस्टमेंट अ‍ॅनॅलिस्ट, स्टॉक ब्रोकर, पोर्टफोलिओ मॅनेजर,  टॅक्स ऑडिटर, टॅक्स कन्सल्टंट, ऑडिटर, स्टॅटिस्टियन, इकॉनॉमिस्ट, क्रेडिट मॅनेजर, ज्युनिअर अकाउंटंट, बुक कीपर, इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- ईकॉमर्स, कॉर्पोरेट लॉयर.

शिक्षणसंस्था :

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर वाणिज्य विषयाचा अभ्यासक्रम बहुतेक सर्वच विद्यापीठांमध्ये करता येतो. काही संस्था पुढीलप्रमाणे-

* सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉलेज- पुणे ल्लझेवियर कॉलेज- मुंबई. * नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई. ल्लएच. आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई. * एलफिन्स्टन कॉलेज- मुंबई.  ल्लके.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स-मुंबई. * आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई. ल्लिहदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स- मुंबई ल्लबी. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स- पुणे. * नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स- पुणे. * सर परशुरामभाऊ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स- पुणे. * श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स- दिल्ली. * लोयोला कॉलेज ऑफ कॉमर्स- चेन्नई. * झेवियर कॉलेज- कोलकाता. * सेंट जोसेफ कॉलेज- बेंगळुरू. * कॉलेज ऑफ कॉमर्स- पाटण, प्रेसिडेन्सी कॉलेज- चेन्नई.

वाणिज्य शाखेशी संबंधित स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम :

चार्टर्ड अकाउंटंट-  द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था या विषयाशी निगडित अभ्यासक्रम चालवत असते. बारावी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

संपर्क- www.icai.org

कंपनी सेक्रेटरी-  द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेने कंपनी सेक्रेटरीशिपचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम त्रिस्तरीय आहे.

फाउंडेशन कोर्स कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला करता येतो. आता या संस्थेने पदवीनंतरचा तीन वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे.

संपर्क- www.icsi.org

कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकाउंटंट- (सीडब्ल्यूए)-  इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकाउंटंट ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवते.

तो फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल असा त्रिस्तरीय आहे. फाउंडेशन अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतात. इंटरमिजिएट अभ्यासक्रमास कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर थेट अर्ज करू शकतात. संपर्क- www.icwai.org

चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनॅलिस्ट- पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स अ‍ॅण्ड रिसर्च या क्षेत्रांत करिअर घडवण्यासाठी संबंधित उमेदवार आपले कौशल्य वापरू शकतात. माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्य अवगत केल्यास संधी आणखी वाढू शकते.

चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनॅलिस्ट होण्यासाठी आयसीएफएआय (इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनॅलिसिल ऑफ इंडिया) या संस्थेचा त्रिस्तरीय अभ्यासक्रम करावा लागतो.

हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीनेही करता येतो.

संकेतस्थळ- www.icfai.org

बँकिंग- वाणिज्य शाखेच्या पाश्र्वभूमीसोबत एमबीए, सीए, सीएफए (चार्टर्ड फायनान्शिअल अकाउंटंट) अशा पदव्या असल्यास या क्षेत्रात उच्च श्रेणीच्या संधी मिळू शकतात. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी आता गृह, शैक्षणिक, घरगुती वस्तू कर्ज, म्युच्युअल फंड, कॅपिटल मार्केट, विमा अशा क्षेत्रांत भूमिका विस्तारल्याने त्यांना तज्ज्ञ उमेदवारांची गरज मोठय़ा प्रमाणावर भासू लागली आहे.

गुंतवणूक- या क्षेत्रात रिसर्च अ‍ॅनॅलिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकर, म्युच्युअल फंड एक्झिक्युटिव्ह, कॅपिटल मार्केट मॅनेजर, फायनान्शिअल प्लॅनर, अ‍ॅसेट मॅनेजर, व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आदी करिअर संधी मिळू शकतात.

विमा क्षेत्र- भारतात हे क्षेत्र गतीने वाढत आहे. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विशिष्ट कालावधीच्या अनुभवानंतर उमेदवारांना उत्तमोत्तम करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात.

अ‍ॅक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विमा क्षेत्रात काम करण्यासाठी परवान्यासाठी गरज भासते.