भारतीय लष्करातील विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीप्रक्रियेची इत्थंभूत माहिती-

  • टीजीसी-टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (इंजिनीअर्स)- या प्रशिक्षणासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान विद्याशाखेतील विवाहित किंवा अविवाहित उमेदवार अर्ज करू शकतात. एक वर्षांचे हे प्रशिक्षण इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी देहराडून येथे दिले जाते. हे प्रशिक्षण जानेवारी आणि जुल अशा दोन महिन्यांत सुरू होते. या प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय प्रशिक्षण सुरू होणाऱ्या महिन्याच्या पहिल्या तारखेला किमान २० आणि कमाल २७ असावे. या प्रशिक्षणाची जाहिरात डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रुटमेंट यांच्यामार्फत मार्च किंवा एप्रिल आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित केली जाते.
  • यूईएस- युनिव्हर्सटिी ट्रेिनग स्कीम (इंजिनीअर्स)- या प्रशिक्षणासाठी अभियांत्रिकी विद्याशाखेतील अंतिम वर्षांत असणारे अविवाहित उमेदवार अर्ज करू शकतात. एक वर्षांचे हे प्रशिक्षण इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी देहरादून इथे दिले जाते. हे प्रशिक्षण जुल महिन्यात सुरू होते. या प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय प्रशिक्षण सुरू होणाऱ्या महिन्याच्या पहिल्या तारखेला किमान १८ आणि कमाल २४ असावे. या प्रशिक्षणाची जाहिरात जून किंवा जुल महिन्यात प्रकाशित केली जाते.
  • एईसी (आर्मी एज्युकेशन कॉर्प्स)- या योजनेंतर्गत प्रशिक्षण एक वर्षांचे आहे. हे प्रशिक्षण इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी इथं दिलं जाते. या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार पहिल्या किंवा द्वितीय श्रेणीत जाहिरातीत नमूद विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधर असावेत. या प्रशिक्षणासाठी विवाहित किंवा अविवाहित उमेदवार अर्ज करू शकतात. हे प्रशिक्षण दरवर्षी जानेवारी आणि जुल महिन्यात सुरू होते. या प्रशिक्षणाची जाहिरात डायरेक्टोरेट ऑफ रिक्रुटमेंटमार्फत मार्च किंवा एप्रिलमध्ये किंवा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये प्रकाशित केली जाते. अर्ज डायरेक्टोरेट ऑफ रिक्रुटमेंट यांच्याकडे मे आणि ऑक्टोबरमध्ये पाठवावा लागतो.
  • शॉर्ट सíव्हस कमिशन-तांत्रिक (आर्मी एज्युकेशन कॉर्प्स)- या योजनेंतर्गत प्रशिक्षण ४९ आठवडय़ाचे आहे. प्रशिक्षण ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडेमी चेन्नई इथे दिले जाते. या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार जाहिरातीत नमूद अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयांमध्ये पदवीधर असावेत.

या प्रशिक्षणासाठी विवाहित किंवा अविवाहित पुरुष उमेदवार आणि अविवाहित महिला उमेदवार अर्ज करू शकतात. हे प्रशिक्षण दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. या प्रशिक्षणाची जाहिरात डायरेक्टोरेट ऑफ रिक्रुटमेंटमार्फत जून किंवा जुलमध्ये किंवा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये प्रकाशित केली जाते. अर्ज डायरेक्टोरेट ऑफ रिक्रुटमेंट यांच्याकडे जानेवारी किंवा फेब्रुवारी आणि जुल किंवा ऑगस्टमध्ये पाठवावे लागतात.

preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
  • शॉर्ट सíव्हस कमिशन- जेएजी (जज अ‍ॅडव्होकेट जनरल)- या योजनेंतर्गत प्रशिक्षण ४९ आठवडय़ाचे आहे. हे प्रशिक्षण ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडेमी चेन्नई इथे दिले जाते. या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ५५ टक्के गुणांसह एलएलबी असावेत. या प्रशिक्षणासाठी विवाहित किंवा अविवाहित पुरुष उमेदवार आणि अविवाहित महिला उमेदवार अर्ज करू शकतात. या उमेदवारांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. या प्रशिक्षणाची जाहिरात डायरेक्टोरेट ऑफ रिक्रुटमेंटमार्फत जुल किंवा ऑगस्टमध्ये किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये प्रकाशित केली जाते. अर्ज डायरेक्टोरेट ऑफ रिक्रुटमेंट यांच्याकडे सप्टेंबर किंवा फेब्रुवारीमध्ये पाठवावे लागते.

संपर्क- संकेतस्थळ-  www.joinindianarmy.nic.in

ई-मेल- dir-recruiting6-mod@nic.in

ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स

पुढे नमूद केलेल्या ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स आणि इतर श्रेणीसाठी भारतीय लष्करात भरती केली जाते.

  • सोल्जर (जनरल डय़ुटी) सर्व शाखा- अर्हता- शालांत परीक्षेत ४५ टक्के गुण आणि प्रत्येक विषयात किमान ३३ टक्केगुण. वयोमर्यादा- साडेसतरा वष्रे ते २१ वष्रे.
  • सोल्जर (तांत्रिक- टेक्निकल आम्र्स/आर्टलिरी/आर्मी एअर डिफेन्स- अर्हता- भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र आणि गणित, इंग्रजी या विषयांसह ४५ टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण आणि शालांत परीक्षेत ५० टक्के गुण आणि तीन वष्रे कालावधीचा अभियांत्रिकी पदविका). वयोमर्यादा- साडेसतरा वष्रे ते २१ वष्रे.
  • सोल्जर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल- सर्व शाखा- अर्हता- कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत सरासरीने ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक. दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी आणि गणित/ अकाऊंट्स/ बुककीिपग या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या विषयांमध्ये उमेदवारांना किमान ४० टक्के गुण मिळायला हवे. ज्या पदवीधरांनी इंग्रजी/ अकाऊंट्स/ बुककीिपग या विषयांचा अभ्यास केला असेल त्यांना दहावी आणि बारावीमध्ये या विषयात किमान गुण मिळवण्यापासून सवलत देण्यात येते. मात्र, ज्या पदवीधरांनी या विषयांचा अभ्यास पदवीस्तरावर केला नसेल त्यांना दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी/ गणित/ अकाऊंट्स/ बुककीिपग या विषयांमध्ये किमान एकदा ४० टक्क्यांहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. वयोमर्यादा- साडेसतरा वष्रे ते २१ वष्रे.
  • सोल्जर नìसग असिस्टंट (आर्मी मेडिकल कॉर्प्स) नìसग असिस्टंट- व्हेटरनरी- अर्हता- बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह सरासरीने ५० टक्के गुण आणि प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण. वनस्पतीशास्त्र/ प्राणिशास्त्र/ जैव-विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसह बी.एस्सी. केलेल्या उमेदवारांना बारावीमध्ये या विषयांमधील किमान गुणांपासून सवलत देण्यात येते. मात्र या उमेदवारांनी या चारही विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वयोमर्यादा- साडेसतरा वष्रे ते २१ वष्रे.
  • सोल्जर ट्रेड्समन- सर्व शाखा- दहावी किंवा आयटीआय. मेस कीपर किंवा हाऊस कीपरसाठी किमान अर्हता आठवी उत्तीर्ण. वयोमर्यादा- साडेसतरा वष्रे ते २१ वष्रे.
  • हवालदार (सव्‍‌र्हेयर ऑटो काटरेग्राफर इंजिनीअर्स)- अर्हता- गणित विषयासह बी.ए./ बी.एस्सी., बारावीमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा- २० ते २५ वष्रे.
  • ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स रिलिजिअस टीचर्स- अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी आणि संबंधित धर्माशी संबंधित सुयोग्य अशी शैक्षणिक अर्हता. वयोमर्यादा- २७ ते ३४ वष्रे.
  • ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स कॅटेिरग- आर्मी सíव्हस कॉर्प्स- अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण आणि एक वर्ष कालावधीचा कुकरी/ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेिरग विषयातील पदविका किंवा प्रमाणपत्र. वय- २१ ते २७ वष्रे.
  • हवालदार- एज्युकेशन (आर्मी एज्युकेशन कॉर्प्स)- अर्हता- बीएस्सी/ बीसीए/ बीएस्सी. आयटी/ बीटेक/ बीई/ बीए वयोमर्यादा- २० ते २५ वष्रे. (उत्तरार्ध)ekank@hotmail.com