लोकसत्ता डॉट कॉम
विश्वसनीय बातम्या व दर्जेदार लेखांची पर्वणी तुम्हाला देणारी मराठीतली अग्रगण्य वेबसाइट!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह भारत आणि जगभरातील बातम्यांसाठी तुमच्या विश्वसनीय स्रोतामध्ये स्वागत आहे. ‘लोकसत्ता’ची वेबसाइट मराठीमध्ये वाचकांना महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या देण्यासाठी समर्पित आहे.
आमच्याबद्दल: स्वातंत्र्यपूर्व काळापासून धीरोदात्तपणे पत्रकारिता करत असलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’चा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. इंडियन एक्स्प्रेस हे १९३२ सालापासून अखंडित बातम्या देणारे विश्वसनीय सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र आहे. कालौघात वाचकांची वाढती व बदललेली भूक लक्षात घेत वर्तमानपत्रांनी व डिजिटल माध्यमांनी कात टाकली. हे बदल स्वीकारताना, पत्रकारितेची मुलभूत कर्तव्ये, निष्पक्ष वार्तांकन आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याची भूमिका ‘लोकसत्ता’ने सदैव घेतलेली आहे.
आम्ही वाचकांना काय देतो?
आम्ही दिवसाचे २४ तास महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या तसेच भारत आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या देतो. आमची डायनॅमिक वेबसाइट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी असून विश्वासार्ह बातम्या तसेच महत्त्वाच्या घटनांचे सखोल विश्लेषण करते. ज्यामुळे वाचकांना केवळ बातमीच कळत नाही तर बातमीमागील बातमी, तिचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम याची सखोल माहिती मिळते. आमच्या टीममध्ये अनुभवी पत्रकार आणि संपादक आहेत, जे तुमची बातम्या जाणून घेण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत असतात. आम्ही वेळोवेळच्या ट्रेंड्ससह राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, जीवनशैली, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व विषयांना तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या: आम्ही तुम्हाला राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे रीअल-टाइम अपडेट्स देतो.
सखोल विश्लेषण आणि मत: आमचे अनुभवी लेखक घटनांचे सखोल अन्वयार्थ तसेच जटिल विषयांचे साध्या सोप्या शैलीत विश्लेषण देतात.
विश्वसनीय स्त्रोत: आम्ही ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या पत्रकारांच्या देशव्यापी नेटवर्कवर आणि विश्वसनीय स्त्रोतांचा वापर करून सत्याधारित पत्रकारिता करतो.
वाचकांसाठी आनंददायी वेबसाइट: दिसायला आकर्षक, वाचायला सोपी-सुटसुटीत वेबसाइट कशी राहील आणि वाचनाचा अनुभव आनंददायी कसा होईल याकडे आम्ही लक्ष पुरवतो.
प्रादेशिक विस्तार: महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी शहरांसह ग्रामीण भागातील शिक्षण, राजकारण, गुन्हेगारी, आरोग्य, सांस्कृतिक अशा महत्त्वाच्या घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
राजकारण: प्रत्येकाच्या जीवनावर राजकीय घडामोडींचे पडसाद उमटत असतात. राजकारणातील अद्ययावत व अचूक बातम्या देण्यासाठी आम्ही झटत असतो.
क्रीडा: आरोग्यमयी जीवनामध्ये शारीरिक खेळाचे महत्त्व असते तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठीही क्रीडाविश्व मोलाचे असते. हे लक्षात घेऊन वाचकांच्या रुचीनुसार महत्त्वाच्या घडामोडींच्या यथासांग बातम्या व विश्लेषणात्मक लेखन आम्ही करतो.
मनोरंजन: देशाची मनोरंजनाची राजधानी मुंबईतच आहे. शिवाय मराठी चित्रपट व नाटकसृष्टीही जोमाने बहरतेय. या क्षेत्राचे वाचकांच्या मनात असलेले स्थान लक्षात घेऊन या क्षेत्राशी संबंधित इत्यंभूत घडामोडी देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
अर्थ: मनोरंजनाप्रमाणेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे. शेअर बाजार, सोने-चांदी, उद्योगजगत याबरोबरच वाचकांना थेट मदत करणाऱ्या पर्सनल फायनान्सच्या बातम्या व तज्ज्ञांचे लेखही आपण सातत्याने देत असतो.
सांस्कृतिक: सण, उत्सव, परंपरा आदी मराठी मनाला रिझवणाऱ्या घटनांच्या तपशीलवार बातम्या व माहिती आम्ही सातत्याने देतो.
करिअर: नोकरीच्या संधी असोत वा युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्दगर्शन असो, लोकसत्ता संबंधित बातम्या व लेख देण्यात नेहमीच अग्रणी राहिलेला आहे.
जीवनशैली: आरोग्य, फॅशन, प्रवास, खाद्य अशा विविध अंगानं बदलत्या जीवनशैलीचा मागोवा घेतानाच, काय करावं व काय टाळावं हे तज्ज्ञांच्या माध्यमातून सातत्याने देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
‘लोकसत्ता’ विश्वसनीय व अत्यंत जलदपणे वाचकांना बातम्या देण्यासाठी वचनबद्ध आहे. इंडियन एक्स्प्रेस समुहाच्या ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी जोडलेले राहा आणि आपल्या ज्ञानात भर घालत राहा.
खास तुमच्यासाठी लिहिलेला प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी विनामूल्य नोंदणी करा.
सोशल मीडियावर आम्हाला नक्की फॉलो करा.
न्यूजलेटर्स थेट इनबॉक्समध्ये मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा.
वाचनाचा अवर्णनीय आनंद मिळवण्यासाठी आमचं अॅप डाउनलोड करा.