नव्वदच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खूप कठीण काळ होता. या काळामध्ये उत्तम क्रिकेटपटू असूनही संघ मागे पडला होता. २००० मध्ये संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी नव्या विचारांनी संघामध्ये नवा मार्ग दाखवला आणि भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. प. बंगालमध्ये ८ जुलै १९७२ मध्ये जन्म झालेल्या सौरव गांगुलींना सर्वजण प्रेमाने दादा या नावाने संबोधतात. १९९२ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने तरप ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारे ते दुसरे भारतीय आहेत. आपल्या वागण्यातून त्यांनी सहकाऱ्यांना नेहमी प्रेरीत केले. लॉर्डवर टी-शर्ट काढून सेलिब्रेट करणारे दादा नेहमीच भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहणार आहेत. २००८ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि समालोचन, प्रशिक्षण या गोष्टींसाठी वेळ काढला. ऑक्टोबर २०१९ मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाल २०१९ ते २०२२ अशा अवघ्या चार वर्षांचा होता. Read More
Rishabh Pant Updates: दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याच्याजागी कोणाला…
Sourav Ganguly Biopic: भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या बायोपिकमध्ये…
Pervez Musharraf And Sourav Ganguly: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ हेही क्रिकेटचे चाहते होते. पाकिस्तान दौऱ्यावर त्यांनी एकदा भारतीय…