सौरव गांगुली Photos

नव्वदच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खूप कठीण काळ होता. या काळामध्ये उत्तम क्रिकेटपटू असूनही संघ मागे पडला होता. २००० मध्ये संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी नव्या विचारांनी संघामध्ये नवा मार्ग दाखवला आणि भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. प. बंगालमध्ये ८ जुलै १९७२ मध्ये जन्म झालेल्या सौरव गांगुलींना सर्वजण प्रेमाने दादा या नावाने संबोधतात. १९९२ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने तरप ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारे ते दुसरे भारतीय आहेत. आपल्या वागण्यातून त्यांनी सहकाऱ्यांना नेहमी प्रेरीत केले. लॉर्डवर टी-शर्ट काढून सेलिब्रेट करणारे दादा नेहमीच भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहणार आहेत. २००८ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि समालोचन, प्रशिक्षण या गोष्टींसाठी वेळ काढला. ऑक्टोबर २०१९ मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाल २०१९ ते २०२२ अशा अवघ्या चार वर्षांचा होता. Read More
Sourav Ganguly: Know Sourav Ganguly's Big Decisions as BCCI President
9 Photos
सौरव गांगुली: बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचे हे आहेत मोठे निर्णय, जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून सुट्टी होणार आहे. २०१९ मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.

india-cricketers restaurants
15 Photos
सिर्फ खिलाडी समझे क्या…बिझनेसमन है मैं! विराटसह ‘हे’ क्रिकेटर आहेत हॉटेलमालक; पाहा PHOTO

आपल्या धडाकेबाज खेळीमुळे भारतीय क्रिकेटर केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी…

When Nagma Broke Silence On Her Alleged Affair With Sourav Ganguly and Their Break Up
12 Photos
PHOTOS: …जेव्हा नगमाने गांगुलीसोबतच्या अफेअरवर सोडलं होतं मौन; म्हणाली होती “अहंकार तसंच एकत्र राहण्याचा…”

सौरव आणि नगमाची भेट १९९९ च्या वर्ल्ड कपदरम्यान झाली होती. यानंतर अनेकदा ते एकत्र दिसले होते. त्यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा…