scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
We want to take forward politics based on BJP ideology said Dr. Atul Bhosale
भाजप विचारधारेवरील राजकारण पुढे आणायचे आहे- डॉ. अतुल भोसले

सगळ्यांना बरोबर घेवून नव्या जुन्यांचा मेळ घालत स्थानिक निवडणुका जिंकायच्या असल्याचे भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

BJP shows strength through 'Tiranga Yatra' in Solapur
सोलापुरात ‘तिरंगा यात्रे’तून भाजपचे शक्तिप्रदर्शन

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकाजवळील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहिल्यानंतर तिरंगा यात्रेला प्रारंभ झाला.

Aaditya Thackeray,CM Devendra Fadnavis Shiv Sena questions BJP dishonest promise of daily water
दररोज पाणी देण्याचे आश्वासन कुठे गेले? ‘भाजप’ला लबाड ठरवत शिवसेनेचा सवाल; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

‘लबाडांनो पाणी द्या’ या गेल्या ३४ दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाचा समारोप शुक्रवारी मोर्चा काढून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

buldhana bjp office inauguration Devendra Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात,‘भाजप विचारांची पाळेमुळे घट्ट रुजलेली’ येत्या काळात…

भाजपच्या विचारांची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खोलवर रुजली असून, येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे ‘हक्काचे घर’ असलेले पक्ष कार्यालय उभारले जाणार…

Shiv Sena, container , Mira Bhayandar, container,
मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे नवे कंटेनर, कंटेनर वाद टोकाला

भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेला कंटेनर वाद थांबण्याऐवजी अधिक चिघळण्याची चिन्हं आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

BJP Leader Babban Singh Raghuvanshi Obscene Video Viral Removed From Party
BJP Leader Obscene Act: ७० वर्षांच्या भाजप नेत्याचा नर्तकीसह अश्लील Video। पूर्ण प्रकार काय?

BJP Leader Babban Singh Raghuvanshi Obscene Video Viral Removed From Party: भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एका सार्वजनिक कार्यक्रमात एका नर्तकीसोबत…

BJP MLA Balmukund Acharya Viral Video
Video : तिरंग्याचा अपमान केल्याच्या आरोपावर भाजपा आमदाराचे स्पष्टीकरण; म्हणाले, “कोणीतरी हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे…”

BJP MLA Balmukund Acharya Viral Video : भाजपा आमदाराने व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे.

Non Marathi dominance in Mira Bhayandar bjp politics
मिरा भाईंदर भाजपमध्ये मराठी समाजाला डावलण्याचा प्रयत्न ? जबाबदारीच्या पदावर संधी न मिळाल्याने अंतर्गत नाराजी

मागील दोन दशकांपासून मिरा भाईंदर शहरात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

P Chidambaram
P Chidambaram : इंडिया आघाडीबाबत पी चिदंबरम यांचं मोठं विधान; म्हणाले, “आघाडी अबाधित राहिली तर…”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

BJP leader Babban Singh Raghuvanshi Viral Video
भाजपा नेत्याचं नर्तिकेबरोबर अश्लील कृत्य, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पक्षाकडून कारवाई

BJP leader Viral Video : या व्हायरल व्हिडीओत दिसतंय की बब्बन सिंह एका वरातीवेळी नृत्य करणाऱ्या नर्तिकेबरोबर अश्लील कृत्य करत…

संबंधित बातम्या