मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
detail information about Navi Mumbai School Case
Navi Mumbai School Case: बस चालकाकडून मुलावर अत्याचार, मुख्याध्यापकांवरही कारवाईची मागणी

नवी मुंबईतील एका शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या…

MNS counter hall, MNS , Political parties, loksatta news,
मनसेच्या प्रतिसभागृहाकडे राजकीय पक्षांची पाठ

मुंबई महापालिका सभागृहाच्या धर्तीवर मनसेने शनिवारी प्रतिसभागृह भरविले होते. या सभेत मुंबईतील विविध नागरी समस्या, रस्ते, आरोग्य, पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन…

Shiv sena mla sanjay gaikwad
Sanjay Gaikwad: “हिंदीबरोबर उर्दू भाषाही शिकवा, म्हणजे अतिरेक्यांचे…”, मनसेवर टीका करताना संजय गायकवाड यांची अजब मागणी

Sanjay Gaikwad on Urdu Language: हिंदीबरोबर राज्यात उर्दू भाषाही शिकवली जावी, अशी अजब मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.

MNS Workers Confront Pizza Store
Video : सडलेल्या भाज्या अन् अस्वच्छता! “चिमुकल्याने पिझ्झा खाल्ला अन्…”; मनसे कार्यकर्त्यांनी स्टोअरमध्ये घातला राडा

Viral Video : मनसे कार्यकर्त्यांनी एका पिझ्झा स्टोअरची पोलखोल केली आहे. एका चिमुकल्याने पिझ्झा खाल्ल्यानंतर त्याला दिवसभर उलट्या झाल्या. नेमकं…

MNS Leader Sandeep Deshpandes reactions On Pahalgam Attack
पहलगामच्या हल्ल्याचा केंद्र सरकार १०० टक्के बदला घेणार। मनसैनिक जाणार काश्मीरला। MNS

MNS On Pahalgam Attack: काश्मीरच्या पर्यटनावर घाला घालून पुन्हा काश्मिरी लोकांना दहशतवादाकडे वळवणं हा डाव उधळून लावण्यासाठी देशभरातील लोकांनी काश्मीरला…

Uddhav and Raj Thackeray come together Thackeray government in next five years
उध्दव व राज ठाकरे एकत्र आले तर राज्यात पुढील पाच वर्षांत “ठाकरे सरकार’ येणार , उबाठा आमदार महेश सावंत

उद्धव व राज ठाकरे एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मराठी माणसाला न्याय हक्क मिळेल. – आमदार महेश सावंत

Raj Thackeray Uddhav Thackeray
“शाळकरी मुलांसारख्या अटी पाहून…”, राज-उद्धव युतीबाबत शिंदे गटाचं वक्तव्य; म्हणाले, “राज ठाकरे झुकणार नाहीत”

Uday Samant : उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी राज ठाकरेंसमोर अटी ठेवल्याचा दावा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत…

Maharashtra development questions to eknath shinde
राज-उध्दव युतीच्या प्रश्नावर चिडलेल्या एकनाथ शिंदे यांना राजू पाटील यांनी पाठविले विकासाचे १३ प्रश्न

श्रीकांत शिंदे यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या माजी आमदार राजू पाटील यांनी गेल्याच आठवड्यात शिंदे यांना डिवचले होते.

Sanjay Raut on MNS and Uddhav Thackeray: "हा विषय जिवंतच राहणार" - संजय राऊत
Sanjay Raut on MNS and Uddhav Thackeray: “हा विषय जिवंतच राहणार” – संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह परदेशात आहेत.…

Raj Thackeray Uddhav Thackeray
उद्धव व राज ठाकरेंमधील युतीचा निर्णय २९ एप्रिलनंतरच; मनसे नेते म्हणाले, “पक्षनेतृत्वाने आम्हाला…”

Uddhav and Raj Thackeray : राज्यातील शाळांमधील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत.

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance news in marathi
‘टाळी’बाबत राज ठाकरे यांचा सबुरीचा सल्ला; २९ एप्रिलला भूमिका मांडण्याचे सूतोवाच

राज सध्या परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर २९ एप्रिलला आपली भूमिका मांडणार असल्याचे मनसेच्या नेत्यांनी सांगितले.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांना बॅकफूटवर नेणारं रमेश किणी प्रकरण नेमकं काय आहे?

राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

संबंधित बातम्या