संगीतातला देव अशी ओळख असलेले प्रसिद्ध संगीतकार म्हणजे ए आर रेहमान, नव्वदच्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. आपल्या अनोख्या संगीताने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावले. भारतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण मानाचा ऑस्कर पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांचे आज जगभरात चाहते आहेत. बॉम्बे, रोजा, दिल से, साथिया, रॉकस्टार या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अजरामर झाली आहेत. ए आर रेहमान मूळचे तामिळनाडूचे असून त्यांनी लहानवयातच संगीताचा ध्यास घेतला होता. त्यांचे वडीलदेखील संगीतप्रेमी होते. त्यांचे लग्न झाले असून त्यांना तीन अपत्य आहेत. संगीतक्षेत्राप्रमाणे ते सामाजिक कार्यातदेखील सहभाग घेत असतात.Read More