![mahayuti government yojana stopped Aditya Thackerays criticism Eknath Shinde gave a reply on it](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/hqdefault_737b1c.jpg?w=310&h=174&crop=1)
शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.