अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.Read More
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा धोका मानवजातीला निवारता येणारा नसेल, असे प्रतिपादन करणाऱ्या ‘नेक्सस’ या नव्या पुस्तकाच्या प्रसिद्धी-दौऱ्यासाठी हरारी मुंबईत आले.