आम आदमी पार्टी

आम आदमी पक्ष (AAP) हा एक राजकीय पक्ष असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी २०११ साली झालेल्या सत्तारूढ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित केंद्र सरकारविरोधातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनंतर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. देशात पंजाब राज्य आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आप पक्षाची सरकार आहे.


दिल्लीची धुरा सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाहत आहेत, तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंतसिंग मान या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.

झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. आप पक्षाने २०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. यात आप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पक्षाने काँग्रेसच्या समर्थनाने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केली होती. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार ४९ दिवसच सत्तेवर राहिले. काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने केजरीवाल यांना विधानसभेमध्ये जन लोकपाल विधेयक मंजूर करता आले नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सत्ता सोडली.


२०१५ च्या निवडणुकीत केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत मिळाले. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ६७ जागांवर त्यांना विजय मिळाला आणि केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. विजयाची ही घोडदौड पुढेही सुरू राहिली. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकत आप पक्ष पुन्हा सत्तेवर आला.


दिल्लीच्या बाहेरही आप पक्षाला आपले अस्तित्व निर्माण करता आले. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाने २० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. सध्या आप पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबर निवडणूक लढविली होती. ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आपने ४ जागांवर तर काँग्रेसने ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या चार जागांवर आप पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.


Read More
AAP finishes second behind BJP in Gujarat local body Elections
local body Elections : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’ला गुजरातमध्ये दिलासा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकल्या इतक्या जागा; काँग्रेसची पीछेहाट सुरूच

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.

Punjab AAP Politics
Punjab : ‘आप’च्या मंत्र्याने २० महिने चालवलं अस्तित्वात नसलेलं मंत्रालय; भगवंत मान यांच्या कारभारावर टीका, पंजाबच्या राजकारणात खळबळ

पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे.

Rekha Gupta and Delhi New Cabinet Ministers to take oath today
Rekha Gupta : रेखा गुप्तांना मुख्यमंत्रीपद, मग केजरीवालांना हरवणाऱ्या परवेश वर्मांकडे कोणती जबाबदारी? वाचा कसं असेल मंत्रिमंडळ!

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या आज शपथ घेणार आहेत.

Delhi New CM Announcement 2025 LIVE Updates in Marathi
Delhi New CM Announcement 2025 : रेखा गुप्ता यांनी केला सरकार स्थापनेचा दावा, उद्या घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Delhi CM Oath Ceremony LIVE: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी (२० फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे.…

aap leader murder wife
‘आप’च्या नेत्यानंच पत्नीच्या हत्येसाठी पाठवले होते भाडोत्री हल्लेखोर, नंतर दरोड्याचा केला बनाव; पोलीस तपासात उघड!

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर अनोख मित्तल याने दरोडेखोरांनी पत्नीची हत्या केल्याचा दावा केला होता. पण नंतर पोलीस तपासात नवीन…

aap leader anokh mittal arrested for killing wife
AAP leader Attacked : ‘आप’च्या नेत्यावर सशस्त्र दरोडेखोरांचा हल्ला, चेहऱ्यावर वार केल्याने पत्नीचा मृत्यू

पंजाबमध्ये आप नेत्याच्या पत्नीचा दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

AAP VS BJP Politics
AAP VS BJP : अरविंद केजरीवालांना आणखी एक धक्का; ‘आप’च्या ३ नगरसेवकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ‘एमसीडी’चं समीकरण बदलणार?

AAP Politics : दिल्ली विधानसभेनंतर आता अरविंद केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Arvind Kejriwal Sheesh Mahal Row
Arvind Kejriwal Sheesh Mahal Row : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत.

aam aadmi party Arvind Kejriwal
विश्लेषण : दिल्ली गमावल्याने ‘आप’ला पंजाबची चिंता; नेतृत्व बदलाला बगल?

दिल्ली हातातून गेल्याने आपने पंजाबवर लक्ष केंद्रित केले. हे एकमेव राज्य हातातून गेल्यावर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल. कारण या पक्षाचे…

"Supreme Court expresses displeasure over schemes like Ladki Bahin Yojana."
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, “मोफत योजनांमुळे लोक….”

Ladki Bahin Yojana : मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र (लाडकी बहीण योजना) यासारख्या राज्यांमध्येही मासिक आर्थिक मदतीची अशीच आश्वासने देण्यात…

दिल्लीत दारुण पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या पुढील वाटचालीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (फोटो सौजन्य पीटीआय)
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार? दिल्लीतील पराभवानंतर का होतेय चर्चा? कोणते तीन पर्याय समोर?

Arvind Kejriwal Political options : अरविंद केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

संबंधित बातम्या