आम आदमी पार्टी News

आम आदमी पक्ष (AAP) हा एक राजकीय पक्ष असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी २०११ साली झालेल्या सत्तारूढ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित केंद्र सरकारविरोधातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनंतर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. देशात पंजाब राज्य आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आप पक्षाची सरकार आहे.


दिल्लीची धुरा सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाहत आहेत, तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंतसिंग मान या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.

झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. आप पक्षाने २०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. यात आप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पक्षाने काँग्रेसच्या समर्थनाने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केली होती. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार ४९ दिवसच सत्तेवर राहिले. काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने केजरीवाल यांना विधानसभेमध्ये जन लोकपाल विधेयक मंजूर करता आले नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सत्ता सोडली.


२०१५ च्या निवडणुकीत केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत मिळाले. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ६७ जागांवर त्यांना विजय मिळाला आणि केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. विजयाची ही घोडदौड पुढेही सुरू राहिली. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकत आप पक्ष पुन्हा सत्तेवर आला.


दिल्लीच्या बाहेरही आप पक्षाला आपले अस्तित्व निर्माण करता आले. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाने २० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. सध्या आप पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबर निवडणूक लढविली होती. ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आपने ४ जागांवर तर काँग्रेसने ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या चार जागांवर आप पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.


Read More
Arvind Kejriwal Haryana Election Result
Haryana Election Result : हरियाणात ‘आप’च्या ८८ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त; दिल्लीच्या निवडणुकीत काय होणार? केजरीवालांची धडधड वाढली

हरियाणा राज्याच्या निकालानंतर खरी धडकी आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला भरली आहे. कारण हरियाणात आप आदमी पक्षाला खातेही…

Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणातील निकालावर भाष्य केलं आहे. दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित…

delhi aap mla saurabh bharadwaj bjp mla vijender gupta
Video: दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; मुख्यमंत्री भाजपा आमदारांच्या गाडीत; आपच्या मंत्र्यांचं पायांशी लोटांगण!

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिषी कारमध्ये बसलेल्या असताना त्यांच्यासमोर आपचे सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपा आमदारासमोर थेट लोटांगण घातलं!

Delhi CM Atishi On Sonam Wangchuk
Delhi CM Atishi : दिल्लीत राजकारण तापलं, सोनम वांगचुक यांना भेटू न दिल्याने मुख्यमंत्री आतिशींचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाल्या…

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीत चांगलंच राजकारण तापलं आहे.

kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे काम पुढे नेऊ,…

Delhi Chief Minister Atishi leaves her predecessor Arvind Kejriwals chair empty
दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ‘आप’कडून रामायणाचा प्रचारात वापर; आतिशी यांनी खुर्ची मोकळी सोडून काय साधले? प्रीमियम स्टोरी

Atishi Leaves Empty chair for Kejriwal: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला पाच महिने उरले आहेत. आम आदमी पक्षाला यंदा भाजपाकडून जोरदार टक्कर…

Aam Aadmi Party Janata Ki Adalat at Jantar Mantar
केजरीवालांचे संघाला पाच प्रश्न; जंतरमंतरवर आम आदमी पक्षाची ‘जनता की अदालत’

दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

Manish Sisodia
Manish Sisodia : “तुरुंगात असताना मुलाची फी भरायला लोकांकडे भीक मागावी लागली”, मनीष सिसोदियांनी व्यक्त केली खंत

आम आदमी पक्षाच्या एका सभेत संबोधित करत असताना सिसोदिया यांनी भारतीय जनता पक्षासह केंद्रीय तपास यंत्रणांवरही गंभीर आरोप केले.

Controversy between Medha Kulkarni and Sanjay Singh in the Joint Parliamentary Committee meeting regarding the Waqf Amendment Bill
मेधा कुलकर्णी-संजय सिंह यांच्यात खडाजंगी! वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भातील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वाद

वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भातील दोन दिवस झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीमध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आम आदमी पक्षाचे खासदार…

ताज्या बातम्या