लोकसत्ता डॉट कॉमच्या अपघात (Accident)या सदरामध्ये तुम्हाला अपघात दुर्घटना, अकाली मृत्यू, दुर्दैवी घटनांसंबधित बातम्या वाचता येतील. अपघात हा कित्येकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो. झाड पडणे, वीज कोसळणे, आग लागणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे कित्येक लोक अपघाताला बळी पडतात; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, उगाच नको ते धाडस करणे, योग्य खबरदारी न घेणे, अज्ञानामुळे, चुकीचे ज्ञान अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतातत. कित्येकदा लोक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात करतात. तर कित्येकदा रेल्वेने प्रवास करताना लोक दरवाजात उभे राहून स्टंट करायला जातात आणि अपघाताला बळी पडतात. कित्येकदा लहान मुलांचेही अपघात होतात. कित्येकदा लहान मुलांनी काहीतरी वस्तू गिळल्याच्या किंवा खेळताना पाण्याच्या टाकीत किंवा खड्ड्यात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
मनुष्यच नव्हे, तर कित्येक प्राणी-पक्षीदेखील अपघातांना बळी पडतात; तर कधी प्राण्यांमुळेही मानवाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सर्पदंश, बिबट्यांचा हल्ला, गाईंचा हल्ला, भटका कुत्रा चावल्याच्या अशा अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी विशेष खबरादारी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. अशा स्थानिक, शहर, राज्य, देश आणि विदेशांत होणाऱ्या अपघातांच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. कित्येकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशा व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.