अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झालाय.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अस्थिरतेचं वातावरण आहे. तालिबाननं हंगामी सरकार स्थापन केल्यानंतरही अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाया सुरुच आहेत.