अगस्त्य नंदा Videos
अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन आणि पती निखिल नंदा यांचा तो मुलगा आहे. अगस्त्य हा राज कपूर यांचाही नातू आहे. अगस्त्यची आजी म्हणजेच वडील निखिल नंदा यांची आई रितू नंदा ही राज कपूर यांची मुलगी आहे. अगस्त्य नंदाचा जन्म २३ नोव्हेंबर २००० रोजी झाला आहे. अगस्त्यने २०१९ मध्ये लंडनच्या ‘सेव्हन ओक्स’मधून शिक्षण पूर्ण केले.
अगस्त्यची मोठी बहीण श्वेता नंदाने पदवी प्रदान सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. अगस्त्य लवकरच जोया अख्तरच्या ‘द आर्चीस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून पदार्पण करून अभिनय क्षेत्रात अगस्त्य आपले नशीब आजमवणार आहे. या चित्रपटात अगस्त्यसह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुश कपूरदेखील दिसणार आहे. अगस्त्य आणि सुहाना खान लहानपणीपासूनचे मित्र आहेत. दरम्यान, दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘द आर्चीस’ प्रदर्शित होण्यापूर्वीच अगस्त्यला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांनी शहीद अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित ‘इक्किस’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.
या चित्रपटात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे चित्रपटात अगस्त्याच्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९७२ मध्ये भारत-पाक युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये अवघ्या २१व्या वर्षी अरुण खेत्रपाल हे शहीद झाले होते. अगस्त्यचे दोन्ही चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
Read More