अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.Read More
हिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते.
जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी करावी लागेल, प्रत्येक तालुक्यात नवीन नेतृत्व शोधावे लागेल, अशी अपेक्षा हेमंत ओगले हे विजयी झाल्यानंतर ‘लोकसत्ता’शी…
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते. मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यामधून हद्दपार झाला…