अहमदनगर News

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
Read More
indian meteorological department
हवामान विभागाचा अहिल्यानगर जिल्ह्यात तीन दिवस ‘यलो अलर्ट’

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी…

ahilyanagar 50 crores for farmers
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० कोटी रुपयांचा निधी, १० हजार शेतकऱ्यांना लवकरच निधीचे वितरण

जिल्ह्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांना ५० कोटी रुपये निधीचे वितरण येत्या आठवड्यात होईल.

ahilyanagar district
अहिल्यानगर जिल्ह्यात ४ गावठी कट्टे व ७ काडतुसे पोलिसाकडून जप्त

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात नाकाबंदी सुरू असताना कोतवाली पोलिसांच्या पथकाने एका चारचाकी वाहनातील व्यक्तीकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त…

NCP agitation HDFC bank demand of Ahilyanagar name board ahmednagar
अहिल्यानगर नामकरणासाठी तोडफोड आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एचडीएफसी बँकेची शाखा आहे. या बँकेच्या फलकावर अहमदनगर असा उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी…

Ahilyanagar 38.69 lakhs fraud of trader moong dal transaction
अहिल्यानगर : मूगडाळीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची ३८.६९ लाखांची फसवणूक

पोलिसांनी फिर्यादीनुसार ममता संजय जैन व संजय निमित्त जैन (दोघे रा. शांतिनाथ इम्पेक्स, एमआयडीसी, जळगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला…

Ahilyanagarn Contractors agitation office of Superintending Engineer Public Works Department
अहिल्यानगर : जेसीबी, डंपर, रोडरोलर लाऊन अडवले अधीक्षक अभियंत्याचे कार्यालय; ढोल वाजवत, निषेध फलक घेऊन ठेकेदारांचा मोर्चा

ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी या मागणीसाठी मोर्चा मोर्चा काढला…

Ahilya Devi birth place , Chaundi ,
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थळ चौंडी विकास आराखडा १० मार्चपर्यंत तयार करा, विधान परिषद सभापती राम शिंदे यांची सूचना

सध्या श्रीक्षेत्र चोंडी येथे सुरु असलेली सर्व विकासकामे २ महिन्यात पूर्ण करण्याची सूचना सभापती शिंदे यांनी केली.

accident, motor caught fire, two people death,
अहिल्यानगर : अपघातानंतर मोटर पेटून दोघांचा जळून मृत्यू, मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह तरुणाचा समावेश

जामखेड शहरातील बीड रस्त्यावर चारचाकी मोटार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर, मोटारीने पेट घेतला.

Ahilyanagar, Kiran Kale, Uddhav Thackeray group,
किरण काळे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन

शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले किरण काळे यांनी आज, रविवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.

Bhuikot Fort, Tourism , Tourism Development Plan,
२५ कोटींचा आराखडा; केंद्र सरकारकडून निधी, ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी

सुमारे ५२६ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या, अहिल्यानगर शहराजवळील भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास…

ताज्या बातम्या