अहमदनगर Photos

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
Read More
Who is Jayashree Thorat Sangamner News Update
13 Photos
जयश्री थोरात कोण आहेत? ज्यांच्यावर भाजपा नेत्यानं विधान केल्यामुळं संगमनेर तालुका पेटला

Who is Jayashree Thorat, Sangamner News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याबद्दल भाजपा…

new news of modi
9 Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “काँग्रेस सत्तेवर आल्यावर…”

महायुतीचे नगरमधील उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये मंगळवारी पंतप्रधानांची प्रचारसभा झाली.

Famous Samnapur Vadapav Ansar Chacha on Riot 6
21 Photos
Photos : समनापूरच्या प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचांची संगमनेर दगडफेकीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

संगमनेर दगडफेकीच्या घटनेवर आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांनी प्रतिक्रिया दिली.

SHIVAI Electric Bus
12 Photos
Photos: गावचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसने… एका चार्जिंगमध्ये २५० किमी धावणारी ‘शिवाई’ एसटीच्या ताफ्यात

पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील.

22 Photos
Photos : महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर तुटलेल्या शिड्या-रेलिंगचं साम्राज्य, मात्र वनविभागाचं प्राधान्य आदिवासींच्या दुकानांवर कारवाईला

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या