एआयएमआयएम Videos
एआयएमआयएम (अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) (AIMIM) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. तेलंगणासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि बिहार राज्यात या पक्षाचा प्रभाव आहे. १९८४ पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर एआयएमआयएम पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. सध्या असदुद्दीन ओवैसी हे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
२०१४ तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाकडून या पक्षाला ‘राज्य पक्ष’ म्हणून मान्यता मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून या पक्षाकडून हैदराबादच्या पुढेही इतर राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले होते. बिहारमध्येदेखील या पक्षाने शिरकाव केला. २०२० मधील बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने ५ जागा जिंकल्या होत्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एकच जागा जिंकण्यात यश आले. हैदराबाद मतदारसंघातून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे निवडून आले. त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा पराभव करत आपला बालेकिल्ला राखला.
Read More