ऐश्वर्या राय बच्चन Photos

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
Creative AI photography Bollywood
9 Photos
AI Photos: सलमान-ऐश्वर्याच्या प्रेमाचं जग पाहिलंत का? AI फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

AI and Photoshop Creative Images: या एआय-ने जनरेट केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चाहत्यांना सलमान आणि ऐश्वर्याच्या…

IMDb's list of the top Indian movie stars of 2024
11 Photos
दीपिका, शाहरुख खान आणि आलियाला मागे टाकत तृप्ती डिमरी ठरली 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री, पाहा IMDb ने जाहीर केलेली यादी

2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची संपूर्ण यादी पहा.

aishwarya rai hollywood films
9 Photos
ऐश्वर्या रायने ५ हॉलीवूड चित्रपटांमध्ये केलाय अभिनय, ‘या’ ब्लॉकबस्टरला नकार दिला नसता तर झाली असती इंटरनॅशनल स्टार

ऐश्वर्याने बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही खूप काम केले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की ऐश्वर्याने ५ हॉलिवूड चित्रपटांमध्ये…

Aaradhya Bachchan 13th Happy Birthday Celebration
12 Photos
Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?

Aaradhya Bachchan 13th Happy Birthday: वाढदिवासानिमित्त आराध्याने राखाडी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.

Aishwarya Rai Bachchan Property
9 Photos
ऐश्वर्या रायने तिच्या लग्नात नेसलेली ७५ लाखांची साडी; अभिषेकपेक्षा ४ पट श्रीमंत, दोघांकडे किती मालमत्ता?

आज आपण जाणून घेणार आहोत की ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनपेक्षा किती श्रीमंत आहे आणि तिच्याकडे असलेल्या सर्वात मौल्यवान…

Aaradhya Bachchan transformation
12 Photos
Photos : आराध्या बच्चनने बदलला लूक, दिसतेय ऐश्वर्या पेक्षाही अधिक सुंदर, पाहा लेटेस्ट फोटो

Aaradhya Bachchan New Look: : आराध्या बच्चनचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले जाऊ शकते. आराध्या तिची…

Aishwarya Rai Cannes Look
9 Photos
ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये सहभागी झाली आहे. यातील तिचा लूक चांगलाच चर्चेत आहे.

top 10 richest actresses of bollywood
18 Photos
Photo : ऐश्वर्या ते दीपिका, बॉलीवूडच्या ‘या’१० अभिनेत्री कोट्यवधीच्या मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकतात. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घ्या…

Aradhya Bacchan (1)
9 Photos
PHOTOS : आराध्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पोहोचले शाळेत; अमिताभ बच्चनसह ‘या’ दिग्गजांची हजेरी!

मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बी टाऊनमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

ताज्या बातम्या