ऐश्वर्या राय बच्चन Videos

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
aishwarya and abhishek bacchan grey divorce rumours detail information about Grey Divorce
Grey Divorce: आमिर खान, अर्जुन रामपाल, बिल गेट्स यांनी घेतलेला ‘ग्रे डिव्होर्स’ म्हणजे नेमकं काय?

ऐश्वर्या- अभिषेक खरोखरच ग्रे डिव्होर्स घेणार आहेत का? पण हा ग्रे डिव्होर्स प्रकार आहे तरी काय? ग्रे डिव्होर्स का व…

ताज्या बातम्या