अजय जडेजा

अजय जडेजा (Ajay Jadeja) हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांचे संपूर्ण नाव अजयसिंगजी दौलतसिंगजी जडेजा असे आहे. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९७१ रोजी जामनगर, गुजरात येथे एका राजपुत कुटूंबात झाला. त्यांचे वडील दौलतसिंगजी जडेजा हे जामनगर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा निवडून आले होते. त्यांच्या राजघराण्यात अनेक नावाजलेले क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. त्यामध्ये के.एस.रणजित सिंग (ज्यांच्या नावावरुन रणजी करंडक आहे) आणि के.एस.दुलीप सिंग (ज्यांच्या नावावरुन दुलीप करंडक आहे) आहेत. अशा दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभलेले अजय जडेजा यांचे शिक्षण नवी दिल्ली येथे झाले. त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या परिस्थिती राहणे पसंत नसल्याने ते अनेकदा स्कूलमधून पळून गेले होते. शेवटी नवी दिल्लीमधील सरदार पटेल विद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी तेथील हिंदू कॉलेजमधून पदवी मिळवली. तेव्हा त्यांची ओळख आदिती जेटलीशी झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न केले.


१९८८ पासून अजय जडेजा हे देशपातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये सक्रिय होते. १३ नोव्हेंबर १९९२ रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात त्यांना खेळण्याची संधी देण्यात आली. त्याच वर्षी त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते. ते १९९२ ते २००० या काळात भारतीय संघात होते. त्यांना १५ कसोटी सामने आणि १९६ एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. या काळात ते भारतीय संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक होते. ते फलंदाजी आणि गोलंदाजीही उत्तमरित्या करत. दरम्यानच्या काळात मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये अजय जडेजा हे नाव आले. आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. २००१ मध्ये के. माधवन समितीच्या शिफारशींच्या आधारे पाच वर्षांची बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या आदेशाला आव्हान देत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे २००३ मध्ये ही बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली. २००३ मध्ये त्यांना रणजी खेळण्याची संधी मिळाली.


काही वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी समालोचक आणि प्रशिक्षक म्हणून दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. २०१५ मध्ये अजय यांची दिल्लीच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. पण काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांची नियुक्ती अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून करण्यात आली. त्यांच्या प्रशिक्षणाखाली हा संघ उत्तम कामगिरी करत असल्याचे दिसून येते.


Read More
Madhuri Dixit Ajay Jadeja love story
माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

एका मॅगझिनच्या फोटोशूटच्या निमित्ताने माधुरी दीक्षित व या क्रिकेटपटूची भेट झाली होती.

Jam Saheb Shatrusalyasinhji Maharaj and Cricketer Ajay Jadeja
Ajay Jadeja: माजी क्रिकेटपटू अजय जडेजा झाला ‘राजा’, या संस्थानाच्या गादीवर होणार विराजमान

Ajay Jadeja: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू, कर्णधार अजय जडेजा ५३ व्या वर्षी नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

Ajay Jadeja big statement on Hardik Pandya ahead IPL 2025 Mega Auction
IPL 2025 : ‘हार्दिकला रिलीज करुन ‘या’ तीन खेळाडूंना रिटेन करा…’; अजय जडेजाचा मुंबई इंडियन्सला सल्ला

Ajay Jadeja on Hardik Pandya : आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रिलीज करावे. तसेच इतर तीन…

Ajay Jadeja Refused to Fees From Afganistan in ODI World Cup
“तुम्ही चांगलं खेळा, जिंका हीच माझी गुरुदक्षिणा”; अफगाणिस्तानच्या भारतीय मेन्टॉरने नाकारलं मानधन

Afganistan Cricket: अफगाणिस्तान टी-२० वर्ल्डकप प्रमाणेच भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय…

virat kohli should open rohit should bat at three says ajay jadeja
कोहली सलामीसाठी योग्य! रोहितने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे; अजय जडेजाचे मत

रोहित गेल्या दशकभराहूनही अधिक काळापासून भारतासाठी सलामीवीराची भूमिका बजावत आहे. मात्र, आता त्याच्याऐवजी कोहलीने सलामीला येणे अधिक योग्य ठरेल असे…

I am ready Ajay Jadeja said about becoming the coach of Pakistan compared PAK team with Afghanistan
Ajay Jadeja: अजय जडेजाने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्याबाबत केले सूचक विधान; म्हणाला,“मी तयार…”

Ajay Jadeja on Pakistan Team: भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होण्याच्या प्रश्नावर सूचक विधान केले आहे. त्याच्या…

Stupid question Team India's veteran cricketer Ajay Jadeja angry at Travis Head's comparison with Sehwag
Travis vs Sehwag: “काय मूर्खासारखे प्रश्न…”, ट्रॅविस हेडची वीरेंद्र सेहवागशी तुलना केल्याने अजय जडेजा संतापला

Ajay Jadeja on Travis vs Sehwag: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजाला वीरेंद्र सेहवाग आणि ट्रॅविस हेड यांच्यातील फलंदाजीच्या…

Here there is rejection not selection Ajay Jadeja's sharp words on the system of Indian cricket not given chance to Ishan Kishan
Ajay Jadeja: “इथे रिजेक्शन आहे, सिलेक्शन…”, भारतीय क्रिकेट निवड समितीच्या कारभारावर अजय जडेजा भडकला

Ajay Jadeja on Indian Cricket System: मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या सततच्या अपयशामुळे खेळाडूंबरोबरच संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयलाही टीकेला सामोरे जावे…

Ajay Jadeja
World Cup 2023: १९६ एकदिवसीय सामने खेळणारा ‘हा’ भारतीय दिग्गज अफगाणिस्तान संघाचा झाला मार्गदर्शक, विश्वचषकासाठी केला करार

ICC World Cup 2023: अफगाणिस्तान ७ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. त्याआधी त्यांनी…

If you go to save someone this is the game will kill you Ajay Jadeja makes Surykumar Yadav suggestive statement and advises to Rohit
IND vs AUS: “एखाद्याला वाचवायला गेलात तर हा खेळ…”, अजय जडेजाने ‘मिस्टर ३६०’वर केले सूचक विधान; रोहितलाही दिला सल्ला

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यात त्याने…

Don't just call SKY 360-degree Former cricketer told Ishaan Kishan on double century Mr. 361
IND vs BAN: “फक्त सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हणू नका”, भारताचा माजी फलंदाजाने केले धक्कादायक विधान

भारताचा आघाडीचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला ‘मिस्टर ३६०’ म्हणू नका असे म्हणत त्याने द्विशतकवीर इशान किशनचे कौतुक केले.

संबंधित बातम्या