अजय मिश्रा

अजय मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील राजकारणी आहेत. ते १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील सध्याचे राज्यमंत्री आहेत.ते उत्तर प्रदेशातील खेरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजय मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिह्यातील बनवीर पूर या गावात झाला. आपल्या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूरला जाऊन तेथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या ख्राईस्ट चर्च कॉलेज येथून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.


पुढे त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सहभाग घेतला. २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या १६ व्या विधानसभेच्या निघासन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथील आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये खेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर त्यांना गृह मंत्रालयातील राज्यमंत्रीपद मिळाले. अजय मिश्रा यांची राजकीय कारकीर्द मोठी असली तरी त्या दरम्यान त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये आले. नव्वदीच्या दशकात त्यांच्यावर काही गुन्हे होते. पुढे प्रभात गुप्ता केसमुळेही ते चर्चेत आले. त्यानंतर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनामुळे अजय मिश्रा अडचणीत सापडले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या मतदारसंघाच्या एका कार्यक्रमाला अजय मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काही शेतकरी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध दर्शवला. यावरुन त्यांना आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे एकूणच वातावरण तापले. पुढे ३ ऑक्टोबर २०२१ यांनी अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या एका शेतकरी आंदोलनामध्ये भरधाव गाडी चालवत नेली. यामध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आणि काही आंदोलक जखमी झाले असे म्हटले जात होते. यावरुन प्रकरण आणखी पेटले. पोलिसांनी आशीष मिश्रा यांना अटक केली. पुढे अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काहींनी त्यांना पदावरुन काढून टाकावे असेही म्हटले. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही.


Read More
udayanraje bhosale
VIDEO : उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…

अजय मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

lakhimpur-6
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं, मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं”, ‘या’ भाजपा नेत्याची मागणी

भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्यानं या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागलीय.

लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
stray dogs bit children and elderly people in vasai Nalasopara
वसई, नालासोपाऱ्यात भटक्या श्वानाचा ४२ जणांना चावा; नागरिक भयभीत

शनिवारी वसई पश्चिमेच्या पारनाका गौळवाडा परिसरात एका भटक्या श्वानाने २७ जणांना दंश केल्याची घटना घडली आहे

pune bangalore highway contractor will change say shivendra singh raje bhosale
पुणे – बंगळुरू महामार्गाचा ठेकेदार बदलणार; शिवेंद्रसिंहराजे, नितीन गडकरींकडून अपूर्ण कामाची दखल

मुंबई अथवा दिल्ली येथे लवकरच याबाबत बैठक घेऊन हे काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत

अदानी विद्यापीठाचे प्रा. अनुपम कुमार सिंह यांनी बांधकाम व्यवस्थापन आणि बांधकाम तंत्रज्ञान यापुढील आव्हानांचा आढावा घेतला.

mangrove on 93 hectares of forest land destroyed in thane
ठाण्यातील ९३ हेक्टर कांदळवनाचा नाश; सरकारच्या ‘वन सर्वेक्षण अहवाला’तून धक्कादायक माहिती उजेडात

ठाणे जिल्ह्याबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनेही नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.

Bhujbal to send in national politics Chief Minister Devendra Fadnavis
भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठीच मंत्रिमंडळात स्थान नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे होते. भुजबळ यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यात त्यांना सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत

centre amends rule 93 of conduct of election rules
अन्वयार्थ : आयोगाच्या घटनात्मक स्वायत्ततेला काळिमा

मतदान प्रक्रिया गुप्त राहिली पाहिजे याबाबत दुमत असणार नाही. पण सीसीटीव्हीचे चित्रीकरण बाहेर सादर करायचे नाही या निर्णयाने निवडणूक आयोगाच्या…

ram madhav back amit shah remark on ambedkar in lok sabha
पहिली बाजू : विधायक मतभिन्नता हवी!

काँग्रेस पक्ष, देशाच्या गृहमंत्र्यांची विधानेसुद्धा विपर्यस्तपणे पाहातो आहे आणि आंबेडकरांचे केवळ नाव वापरून राजकारण करतो आहे!

संबंधित बातम्या