अजय मिश्रा Videos

अजय मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील राजकारणी आहेत. ते १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील सध्याचे राज्यमंत्री आहेत.ते उत्तर प्रदेशातील खेरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजय मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिह्यातील बनवीर पूर या गावात झाला. आपल्या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूरला जाऊन तेथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या ख्राईस्ट चर्च कॉलेज येथून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.


पुढे त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सहभाग घेतला. २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या १६ व्या विधानसभेच्या निघासन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथील आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये खेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर त्यांना गृह मंत्रालयातील राज्यमंत्रीपद मिळाले. अजय मिश्रा यांची राजकीय कारकीर्द मोठी असली तरी त्या दरम्यान त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये आले. नव्वदीच्या दशकात त्यांच्यावर काही गुन्हे होते. पुढे प्रभात गुप्ता केसमुळेही ते चर्चेत आले. त्यानंतर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनामुळे अजय मिश्रा अडचणीत सापडले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या मतदारसंघाच्या एका कार्यक्रमाला अजय मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काही शेतकरी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध दर्शवला. यावरुन त्यांना आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे एकूणच वातावरण तापले. पुढे ३ ऑक्टोबर २०२१ यांनी अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या एका शेतकरी आंदोलनामध्ये भरधाव गाडी चालवत नेली. यामध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आणि काही आंदोलक जखमी झाले असे म्हटले जात होते. यावरुन प्रकरण आणखी पेटले. पोलिसांनी आशीष मिश्रा यांना अटक केली. पुढे अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काहींनी त्यांना पदावरुन काढून टाकावे असेही म्हटले. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही.


Read More