अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
Ajinkya Rahane Statement on KKR Defeat and For Not Taking Review on His Wicket PBKS vs KKR IPL 2015
PBKS vs KKR: “मी सर्व दोष घेतो…”, अजिंक्य रहाणेचं पराभवानंतर मोठं वक्तव्य, रहाणेची ‘ती’ एक चूक KKRला पडली भारी

Ajinkya Rahane on KKR Defeat: केकेआरला पंजाब किंग्सकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. या सामन्यात केकेआर संघाला एक मोठी…

MS Dhoni
CSK VS KKR IPL 2025: नामुष्की, शरणागती आणि लोटांगण- चेन्नईचा बालेकिल्ला भुईसपाट, नीचांकी विक्रमांच्या चळती

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.

Varun Chakravarthy
CSK VS KKR IPL 2025: चेन्नईच्या चिंधड्या; कोलकाताचा अद्भुत विजय

चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर शरणागती पत्करली. कोलकाताने ८ विकेट् आणि ५९ चेंडू राखून विजय मिळवला.

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Match Score Updates in Marathi
CSK vs KKR Highlights: कोलकाताने उडवल्या चेन्नईच्या चिंधड्या; ८ विकेट्स आणि ५९ चेंडू राखून अद्भुत विजय

IPL 2025 Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Highlights: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धची लढत महेंद्रसिंग धोनीसाठी कर्णधार म्हणून पहिलं आव्हान…

Ajinkya Rahane Statement on Eden Gardens Pitch Controversy Said If I speak there will be big controversy
KKR vs LSG: “मी काही बोललो तर वाद होतील…”, अजिंक्य रहाणेच्या ईडन गार्डन्स पिचच्या वादावर मोठं वक्तव्य, कर्णधाराच्या एका वाक्याने उडाली खळबळ

KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने लखनौविरूद्धच्या सामन्यातील पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Match Score Updates in Marathi
KKR vs LSG Highlights: लखनौचा केकेआरवर अवघ्या ४ धावांनी विजय, गोलंदाजांनी मारली बाजी

IPL 2025 Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Highlights: कोलकाता नाईट रायडर्ससमोर लखनौ सुपरजायंट्सचं आव्हान असणार आहे.

Yashasvi Jaiswal Kicked Ajinkya Rahane Kit Bag in Anger and Disputes with Mumbai Cricket Association Revealed in Report
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कर्णधार अजिंक्य रहाणेची किटबॅग लाथाडली? ‘हा’ वाद ठरला मुंबई संघ सोडण्यामागचं कारण? धक्कादायक खुलासा

Yashasvi Jaiswal Report: यशस्वी जैस्वालने चॅम्पियन मुंबई संघाची साथ सोडली असून आता तो डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळणार आहे. यादरम्यान…

Simon Doull urges KKR management to consider moving the franchise if Eden Gardens curator ignores concerns.
KKR: रहाणेची विनंती क्युरेटरने नाकारली, माजी गोलंदाज म्हणाला, “केकेआरने कोलकाता सोडावे”

Eden Gardens: यावेळी रहाणेच्या विनंतीला उत्तर देताना क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी, “मी इथे असेपर्यंत” खेळपट्टी बदलणार नाही”, असे म्हटले होते.

KKR vs RCB Ajinkya Rahane Fifty in Just 25 Balls As Captain of Kolkata Knight Riders in IPL 2025
KKR vs RCB: अजिंक्य रहाणेचं KKRसाठी कर्णधार म्हणून पदार्पणात वादळी अर्धशतक, शतकी भागीदारी रचत RCBची केली धुलाई

KKR vs RCB: आयपीएल २०२५ मधील पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेने वादळी खेळी करत केकेआरला दणक्यात सुरूवात करून दिली. यासह त्याने…

Ajinkya Rahane becomes the first Indian cricketer to captain three different teams in the IPL, marking a historic achievement in IPL history.
Ajinkya Rahane: मैदानावर पाऊल ठेवताच रहाणेनं घडवला इतिहास, ठरला तीन संघांचे कर्णधारपद भूषविणारा पहिला भारतीय खेळाडू

Ajinkya Rahane Records: रहाणेचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील हा २६ वा सामना आहे. यापूर्वी त्याने आयपीएल २०१७ च्या एका सामन्यात पुणे…

IPL 2025 Kolkata Knight Riders Full Team, Captain and Schedule in Marathi
IPL 2025 KKR Full Squad: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली केकेआर संघात कोणकोणते खेळाडू? पाहा संपूर्ण संघ आणि वेळापत्रक

Kolkata Knight Riders IPL 2025 Team Player List : आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या महालिलावामुळे सर्व संघांमध्ये मोठे बदल झालेले पाहायला…

ajinkya rahane kolkata knight riders captain
IPL 2025: अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार

कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्य नव्या हंगामासाठी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची नियुक्ती केली आहे.

संबंधित बातम्या