अजिंक्य रहाणे News

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

Ranji Trophy Updates : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फॉलोऑन दिल्यानंतर ओडिशाचा संघ दुसऱ्या डावात २१४ धावांत गारद झाला. पहिल्या डावात…

Mumbai Ranji Team won Irani Cup 2024
२७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी

Mumbai won Irani Cup 2024 : मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला हरवून २७ वर्षानंतर इराणी करंडक पटकावला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या…

What is the Irani Cup competition in domestic cricket and what is its history
इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास

Irani Cup 2024 Updates : इराणी कप २०२४ स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील रणजी चॅम्पियन मुंबई आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील ‘रेस्ट…

Irani Cup 2024 squad announced Ajinkya Rahane vs Ruturaj Gaikwad
Irani Cup 2024 स्पर्धेसाठी संघ जाहीर! दोन मराठमोळे कर्णधार आमनेसामने, ‘या’ तारखेला रंगणार सामना

Irani Cup 2024 Updates : बीसीसीआयने इराणी चषकासाठी संघांची घोषणा केली आहे. हा सामना १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून यामध्ये…

Irani Cup 2024 Ajinkya Rahane lead Ranji Champion Mumbai Team
रणजी चॅम्पियन मुंबईला ‘अजिंक्य’ राखण्यासाठी रहाणे सज्ज! Irani Cup 2024 स्पर्धेत सांभाळणार धुरा

Irani Cup 2024 Updates : इराणी चषक १ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात रणजी चॅम्पियन मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणे…

Ajinkya Rahane : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! जागतिक दर्जाची अकादमी उभारण्यासाठी अजिंक्य रहाणेला दिली जमीन

Ajinkya Rahane gets Bandra plot : भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे मुंबईत स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार आहे. त्यासाठी त्याला मिळालेली जमीन…

Ajinkya Rahane century in County Championship Division Two 2024
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज! काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावत दिले संकेत

Ajinkya Rahane scored a century for Leicestershire : अजिंक्य रहाणेने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू २०२४ दमदार शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचे…

Leicestershire Sign Ajinkya Rahane For County Championship And One Day Cup
अजिंक्य रहाणे ब्रिटिश काउंटीमध्ये लीस्टरशायरसाठी खेळणार, म्हणाला; “पुन्हा खेळण्याची संधी मिळाल्याने…”

Ajinkya Rahane: टीम इंडियातून बाहेर असलेला स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे ब्रिटीश काऊंटीमध्ये खेळणार आहे. रहाणेने गेल्या १ वर्षात टीम इंडियासाठी…

IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्रचा अफलातून झेल, दोघांनी झेल घेत विराटला केलं बाद; VIDEO व्हायरल

IPL 2024: विराट कोहली पुनरागमनानंतर मोठी खेळी न खेळता बाद झाला. अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी मिळून त्याचा झेल…

How Musheer Khan Tanush Kotian and Tushar Deshpande Delivered Win to Mumbai in Ranji Trophy 2024
Mumbai Ranji Title 2024: मुंबईतल्या मैदानात घाम गाळून तयार झाले रणजी विजेते शिलेदार

Mumbai Wins Ranji Trophy 2024 Title: मुंबईच्या जेतेपदाच्या वाटचालीत संपूर्ण मोसमात नव्या दमाच्या तरूणांनी मोठी भूमिका बजावली. तनुष कोटीयन, तुषार…

What Went Behind Mumbais 42 nd Title of Ranji Trophy 2024
Ranji Trophy 2024: मुंबईच्या रणजी जेतेपदाचं मेकिंग ऑफ: अलूरमधील १५ दिवसांचे शिबिर, सरावसत्र, गाणी-डान्स, ४६ बैठका

Ranji Trophy 2024 Winner Mumbai: मुंबई संघाने विक्रमी ४२व्यांदा रणजीचे विजेतेपद पटकावले, पण हा विजय काही साधासोपा नव्हता. अनेक महिन्यांची…