अजिंक्य रहाणे Photos

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
indian-cricketers-celebrating-rakshabandhan
7 Photos
Rakshabandhan 2024: विराट कोहली ते अजिंक्य राहणे ‘हे’ भारतीय क्रिकेटपटू साजरा करणार बहिणींसोबत रक्षाबंधनचा सण; पाहा फोटो

रक्षाबंधन हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. आज रक्षाबंधन निमित्त भारतीय क्रिकेटपटू देखील आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनचा सण साजरा करणार…

IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
7 Photos
IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सच्या संघात सर्वाधिक मराठमोळे खेळाडू, पाहा यादी

IPL 2024 CSK Players: चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सर्वाधिक मराठमोळ्या खेळाडूंचा भरणा आहे. नेमके कोणकोणते खेळाडू आहेत, याचा आढावा घेऊया.

ताज्या बातम्या