अजित आगरकर Photos

अजित भालचंद्र आगरकर (Ajit Agarkar)हे भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आहेत. ते ४ जुलै २०२३ पासून ते बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्हीही फॉरमॅटमध्ये २०० पेक्षा जास्त अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.१९९९, २००३ आणि २००७ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये त्यांचा समावेश होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या संघामध्येही अजित आगरकर होते.


अजित आगरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९७६ रोजी मुंबईत झाला. फार लहानपणी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवत होते. आचरेकर सरांच्या सांगण्यावरुन अजित आगरकर यांना राजा शिवाजी विद्यालयातून शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेतला. शाळेमध्ये असताना अजित शिवाजी पार्क मैदानामध्ये सराव करत असत. याच काळात थोडी फार गोलंदाजी करु शकणार फलंदाज म्हणून ते विकसित झाले. पुढे वयवर्ष १५ असताना त्यांना अंडर-१६ आंतर शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायची संघी मिळाली. तेव्ह त्यांनी तिहेरी शतक झळकावले. मुंबईच्या संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण तेव्हा संघात एका गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे अजित आगरकर यांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. शालेय स्तरावरील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबईच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनले.


त्यांनी ७ ऑक्टोबर १९९८ रोजी अजित आगरकर यांनी पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या विरुद्ध टी-२० सामन्याच्या भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी २६ आंतराराष्ट्रीय कसोटी सामने, १९१ एकदिवसीय सामने खेळले. या कसोटी फॉरमॅटमध्ये त्यांनी ५७१ धावा केल्या तर वनडे फॉरमॅटमध्ये १,२६९ धावा केल्या. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्यांनी कसोटी सामन्यात ५८ गडी बाद केले, तर एकदिवसीय सामन्यामध्ये २८८ गडी बाद केले. गोलंदाजी-फलंदाजीसह ते क्षेत्ररक्षणामध्येही तरबेज होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये २१ चेंडूमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकर यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांनी सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा आणि १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. १९९९-२००० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आगरकर यांनी आगळा-वेगळा विक्रम केला होता. या दौऱ्यामध्ये ते सलग पाच वेळा शून्यावर बाद झाले. या विक्रमामुळे त्यांना बॉम्बे डक हे नाव पडले.


Read More