अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
sharad pawar Ajit Pawar injustice statement maharashtra vidhan sabha election 2024
चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल

आता युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, शऱद पवार यांनी स्पष्ट केले.

What Ajit Pawar Said?
Sharmila Pawar : बारामतीतल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा शर्मिला पवार यांचा आरोप, अजित पवार म्हणाले,”अरे बाबांनो..”

Sharmila Pawar : शर्मिला पवार यांनी केलेले आरोप अजित पवार यांनी फेटाळले. उलट आमच्याच कार्यकर्त्यांना दमदाटी झाली असा आरोप अजित…

Rupali Chakankar talk on Ajit pawar, Rupali Chakankar latest news, Rupali Chakankar marathi news,
अजितदादा लाखांच्या मताधिक्यानी निवडून येतील – रुपाली चाकणकर

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. या मतदारसंघातून मागील ३० वर्षांपासून अजित पवार हे प्रतिनिधित्व करीत आले…

MP Supriya Sule On Ajit Pawar
Bitcoin Scam: “तो आवाज माझ्या बहिणीचा…”, बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांचा धक्कादायक आरोप

Ajit Pawar on Bitcoin Scam: विधानसभा निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर झाला असल्याचा दावा भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केला.…

Ajit Pawar gave a reaction on the allegations made against Supriya Sule and Nana Patole
Supriya Sule Bitcoin Scam: सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर केलेल्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Supriya Sule Bitcoin Case: भाजपाने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी…

Shrinivas Pawar blames Ajit Pawar
प्रचाराच्या सांगता सभेतील पत्र आईचेच आहे का? श्रीनिवास पवार यांची अजित पवार यांना विचारणा

‘माझी आई ८७ वर्षांची आहे. तिचा राजकारणासाठी वापर होतो याचे मला वाईट वाटते आहे. अजित पवार यांची जशी ती आई…

Ajit Pawar, Mission Maidan, Ajit Pawar Baramati,
मला मत म्हणजे भाजपला नव्हे! अजित पवार यांच्याकडून आरोपांचे खंडन

अजित पवार यांना मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काही जणांकडून केला जात आहे. मात्र, मला मिळणारे मत राष्ट्रवादी (अजित…

Sharad Pawar, Yugendra Pawar, Ajit Pawar,
देशात बारामतीची ओळख कोणामुळे? शरद पवार यांनी अजित पवारांना सुनावले

नव्या पिढीकडे सूत्रे देण्याची वेळ आली आहे, असे सांगत शरद पवार यांनी बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन…

Maharashtra Top Politicians Social Media Followers in Marathi
Maharashtra Top Politicians Followers : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस; जाणून घ्या, महाराष्ट्रातील टॉप नेत्यांचे फॉलोअर्स

Maharashtra Top Politicians Social Media Followers : गेल्या महिन्यापासून नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत, पण तुम्हाला माहितीये का, कोणता…

ajit pawar sharad pawar (5)
अजित पवार म्हणाले, “गेल्या वेळी मी जरा एकटा पडलो होतो, पण यावेळी माझी आई…”!

अजित पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार पराभूत झाल्यानंतरही त्यांना राज्यसभा दिली. त्या खासदार आहेत. पक्षानं त्यांचा योग्य तो सन्मान राखला!”

संबंधित बातम्या