अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
NCP ministers rows have singed Ajit Pawar put Fadnavis government on backfoot
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे फडणवीस सरकार बॅकफूटवर? कारण काय?

NCP ministers rows Fadnavis government on backfoot विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे दोन मंत्री वादात अडकल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Breaking News Updates: ‘वाळू माफियागिरी एका दिवसात संपणार नाही’ महसूल मंत्री बावनकुळेंचे विधान

Maharashtra Politics LIVE Updates, 21 February 2025: भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर…

narendra maharaj on mahayuti victory
Narendra Maharaj : “महाराष्ट्रात महायुतीचा विजय साधू-संत, संघामुळेच”, नरेंद्र महाराजांचं विधान चर्चेत; म्हणाले, “अजित पवारांनाही खात्री नव्हती”! फ्रीमियम स्टोरी

नरेंद्र महाराज म्हणतात, “एकनाथ शिंदेंना वाटतंय लाडकी बहीण योजनेमुळे विजय मिळाला, पण तसं मुळीच नाहीये”!

jitendra awhad, Ajit Pawar, angry , Thane,
म्हणून अजित पवार यांना माझा राग येतो, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिजीत पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला रामराम करत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला. यानिमित्ताने राष्ट्रवादी (शरद…

Rekha Gupta Takes Oath As Delhi chief minister Parvesh verma and these 5 MLAs also took the oath for cabinet minister
15 Photos
अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या मंत्रिमंडळात, पार पडला शपथविधी सोहळा!

दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

devendra fadnavis government 100 days
Video: दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षांमुळे क्रमांक एकच्या पक्षाची अडचण? राज्यात नेमकं घडतंय काय? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

Maharashtra Government 100 Days Performance : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला लवकरच १०० दिवस पूर्ण होत असून त्याअनुषंगाने महायुतीतील तीन पक्षांमधल्या…

malegaon sahakari sakhar karkhana election
बारामतीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’त पुन्हा लढत? माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची तयारी सुरू

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही निवडणूक चुरशीची होईल, अशी चर्चा बारामतीमध्ये आहे.

Budget Session 2025
Budget Session 2025 : राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार; शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना, कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार आहे. ३ मार्च ते २१ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे.

Ajit Pawar , Dhananjay Munde ,
अन्वयार्थ : अजितदादा, निर्णय तुम्हीच घ्यायचा… फ्रीमियम स्टोरी

धनंजय मुंडे यांनाच राजीनाम्याबाबत विचारा, असे अजित पवार हे आता सांगत असले तरी गेल्या महिनाभरात मुंडे यांना अजितदादांनीच वारंवार पाठीशी…

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात जुन्नर येथे गुप्त बैठक; भेटीचे रहस्य गुलदस्त्यात

जुन्नर येथे आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे  शरद पवार गटाचे बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतलेली भेट…

Ajit pawar on dhananjay Munde
Ajit Pawar : “धनंजय मुंडेंनाच विचारा”, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवार संतापले; म्हणाले, “तेही काही गोष्टी…” प्रीमियम स्टोरी

विरोधकांचे प्रश्न पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी राजीनामाप्रकरणी मुंडेंनाच प्रश्न विचारा, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या