अजित पवार News

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
sharad pawar Diwali padwa
पवार कुटुंबीयांचा बारामतीत वेगवेगळा पाडवा; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत नागरिकांच्या भेटीला

बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतंत्रपणे पाडवा साजरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ajit pawar devendra fadnavis (2)
फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’नंतर आता अजित पवारांचं ‘येणार, येणार, येणारच’!

२०१९ च्या निवडणुकीत प्रचारसभांमध्ये सातत्याने फडणवीसांनी याच उक्तीचा पुनरुच्चार केला. पक्षाच्या बॅनर्सवरही देवेंद्र फडणवीसांचं हेच विधान पाहायला मिळत होतं.

Sharad Pawar Baramati , Ajit Pawar Baramati ,
दिवाळीत बारामतीमध्ये फुटणार राजकीय फटाके, कारण दोन्ही पवार…!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत गाठीभेटींना सुरुवात केली आहे.

Ajit Pawar Baramati Vidhansabha
Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत! प्रीमियम स्टोरी

अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे या मतदारसंघात आता कोणाची वर्णी लागेतय हे जनतेचा कौल…

maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही? प्रीमियम स्टोरी

महाविकास आघाडीचे सरकार असताना एसीबीचे तत्कालीन महासंचालक संजय वर्बे यांनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी नागपूर खंडपीठापुढे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विदर्भ…

ajit pawar and sharad pawar
तीन दिवस मुक्काम पोस्ट बारामती : औचित्य दिवाळी; उद्दिष्ट प्रचार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत गाठीभेटींना सुरुवात केली आहे.

Ajit Pawar Clarification statement on alleged irrigation scam RR Patil Pune news
सद्सद्विवेकबुद्धीला वाटले, ते बाेललाे; अजित पवारांचे ‘त्या’ वक्तव्याबाबत स्पष्टीकरण

‘कथित सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या नस्तीवर (फाइल) तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी करून केसाने गळा कापल्याच्या विधानाचा निवडणुकीशी…

Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत.

ajit pawar, pawar family get together, diwali, baramati,
दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? या प्रश्नावर अजित पवारांचे दोन शब्दांत उत्तर…

दरम्यान दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र येणार का या प्रश्नावर मोघम उत्तर अजित पवारांनी दिलं.

Ajit Pawar Irrigation scam
Ajit Pawar : विस्मृतीत गेलेल्या सिंचन घोटाळ्याची फाईल अजित पवारांनीच उघडली? यावेळी कोण वाहून जाणार?

Ajit Pawar on Irrigation Scam : अजित पवार म्हणाले, “मला बदनाम करण्यासाठी सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले.

Sharad Pawar candidates Marathwada,
भाजप, शरद पवारांचे उमेदवार मराठवाड्यात सर्वत्र; काँग्रेस, अजित पवारांची पाटी काही जिल्ह्यांमध्ये कोरी

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये भाजप २०, शिवसेना (एकनाथ शिंदे) १६ आणि अजित पवार नऊ मतदारसंघांत आणि राष्ट्रीय समाज पक्ष एक…

Ajit Pawar met rebel Nana Kate, Ajit Pawar latest news,
बंडखोर नाना काटेंची अजित पवारांनी घेतली भेट; महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीतून बंडखोरी करणाऱ्या नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. काही वेळ चर्चा झाल्याचं समोर…

ताज्या बातम्या