अजित पवार Photos

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
Maharashtra cabinet expansion News, Ncp ajit pawar ministers list
11 Photos
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ ९ आमदार झाले मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या ९ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

Ajit Pawar wife owns more property than him
10 Photos
उपमुख्यमंत्री अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत पत्नी सुनेत्रा पवार, ‘इथे’ केली आहे सर्वाधिक गुंतवणूक

Ajit Pawar s wife owns more property than him: उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चेत आहेत. अजित…

chief minister Devendra fadanvis dcm Eknath shinde and ajit pawar pays tribute to dr Babasaheb Ambedkar on mahaparinirvan diwas at chaityabhoomi
11 Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

uddhav thackeray meets baba adhav, baba adhav protest sharad pawar ajit pawar uddhav thackeray meets Baba Adhav at pune
10 Photos
Photos : उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी सोडलं उपोषण; शरद पवार, अजित पवारांनी घेतली होती भेट

Baba Adhav Pune Protest Photos : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या ईव्हीएम घोटाळ्यावरून…

Maharashtra assembly results 2024 women winner candidates and there constituencys
24 Photos
महाराष्ट्रातील ‘या’ २१ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदारांच्या हाती

Maharashtra Assembly Results 2024 : राज्यामध्ये २१ मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. कोणते आहेत हे मतदारसंघ ज्यांचे नेतृत्व आता…

Chief Minister Eknath Shinde resigns
10 Photos
एकनाथ शिंदेंचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार; शपथविधीबाबत उत्सुकता शिगेला!

Eknath Shinde resigns as Maharashtra CM : आज महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची मुदत (२६ नोव्हेंबर) संपली असल्याने हा निर्णय घेण्यात…

Ajit Pawar Won from baramati yugendra pawar sharad pawar ncp maharashtra vidhansabha result
9 Photos
अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

Ajit Pawar Baramati Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.

ajit pawar baramati election 2024
12 Photos
Baramati : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, युगेंद्र पवार देणार काकांना लढत

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : दरम्यान, बारामतीमध्ये यंदा काका पुतण्याची लढत पाहायला मिळणार आहे.

maharashtra vidhansabha elections 2024
9 Photos
महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांमध्ये नवी पिढी मैदानात, दिग्गजांना देणार फाईट!

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत, एवढच नाही तर नव्या पिढीकडून ही…

ताज्या बातम्या