अखिलेश यादव Photos
जेष्ठ राजकारणी मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा जन्म १ जुलै १९७३ रोजी झाला. जन्माच्या वेळी समस्या उद्भवल्याने त्यांच्या आई आजारी पडल्या. २००३ मध्ये अखिलेश यांच्या आईचे निधन झाले. दरम्यानच्या काळात मुलायम राजकारणामध्ये व्यस्त असल्याने त्यांचे संगोपन आजी-आजोबांनी केले. राजस्थानमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियात्रिकी शिक्षण घेतले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातून मास्टर्स केले आहे. वडिलांप्रमाणे अखिलेश यांनाही राजकारणाची आवड होती. ते समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कनौज मतदारसंघातून २००० साली ते निवडून आले.
१० मार्च २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या वेळी ते ३८ वर्षांचे होते. सर्वात कमी वयामध्ये मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. सध्या ते विरोधी पक्ष नेते म्हणून कामकाज पाहत आहेत.Read More