अकोला (Akola) हे विदर्भातील एक मुख्य शहर असून ते अमरावती विभागात येते. अकोलसिंग राजाच्या नाववरून या शहराला अकोला हे नाव पडले. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. तसेच हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध असेलले बाळापूर हे शहरही अकोला जिल्ह्यात आहे.
अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. येथील गाविलगडच्या डोंगररांगांत वसलेला नरनाळा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. बहामनी राजाच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे.Read More
दीक्षांत समारंभ हा गुणवंतांचा सन्मान करण्याचा दिवस. पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिमान बाळगण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण…
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अजितदादा पवार यांची नियुक्ती झाली. अजितदादांनी सर्वप्रथम आमच्यासह देशमुख समाजाला न्याय देण्याचे कार्य करावे, अशी अपेक्षा…