अक्षया देवधर Photos

अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. अक्षयाचा जन्म १४ मे १९९४ रोजी झाला असून तिचे वय २९ वर्ष आहे. अक्षयाचे जन्म आणि शालेय शिक्षण पुण्यात झाले आहे. अक्षयाने तिचे शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूलमधून पूर्ण केले, तर बीएमसीसीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अक्षया शाळेत असताना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असे. तिच्या कॉलेजच्या काळातही तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तिने अमेय वाघसह ‘आयटम’ या नाटकातून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. तिने ‘बिनकामाचे संवाद’, ‘दर्शन’, ‘संगीत’, ‘मान-अपमान’सारख्या नाटकांमध्ये काम केले आहे.


२०११ मध्ये अक्षयाने ‘शाळा’ चित्रपटात ‘अक्का’ची भूमिका साकारून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०१६ साली तिने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. या मालिकेतील तिचे ‘पाठक बाई’ हे शिक्षकेचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले.


मालिकेमध्ये अभिनेता हार्दिक जोशीसह अक्षयाने मुख्य भुमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही जोडी प्रचंड आवडली. ऑनस्क्रीन राणादा व पाठकबाईची जोडीपासून ते खऱ्या आयुष्यातले नवरा-बायको झालेल्या या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. हार्दिक आणि अक्षया यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचा शाहीविवाह सोहळा पुण्यात पार पडला. हार्दिक आणि अक्षया यांचा लग्नसोहळा सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच अक्षयाची मंगळगौर पार पडली, तेव्हा ती पुन्हा चर्चेत आली होती. हार्दिकला डेट करण्यापूर्वी अभिनेता सुयश टिळक आणि अक्षया देवधर एकमेकांना डेट करत होते. पण, काही कारणास्तव त्यांनी सहमतीने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.


Read More
akshaya deodhar new business of saree
9 Photos
पाठकबाई झाल्या बिझनेसवुमन! अक्षया देवधरने सुरू केला साड्यांचा व्यवसाय, नाव ठेवलंय खूपच खास; पाहा फोटो

अक्षया देवधरचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण! सुरू केला साड्यांचा बिझनेस, शेअर केले सुंदर फोटो

hardeek akshaya makar sankrant special look
12 Photos
…अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो

Makar Sankranti 2023: लग्नानंतर पहिल्या मकर संक्रांती सणासाठी अक्षया-हार्दिक खास लूक.

ताज्या बातम्या