![Neelam Gorhe refused permission to Ambadas Danve to speak after fight in legislature over Babasaheb ambedkar insult by amit shah](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/12/Ambadas-Danve-Neelam-Gorhe.jpg?w=310&h=174&crop=1)
अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.
सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.