अमित शाह Videos
अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.
२०१४ पासून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अमित शाह यांनी १९७८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. १९९७ साली ते पहिल्यांदा अहमदाबाद येथील सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भुषवली आहेत.
ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. १९९७ ते २००७ पर्यंत ते सलग चारवेळा सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेत निवडून आले आहेत.
Read More