
अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे अमित ठाकरे हे सुपुत्र आहेत. अमित ठाकरेंचा जन्म २४ मे १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. अमित ठाकरे उत्तम फुटबॉल खेळतात. तसेच अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेत असतात. अमित राज ठाकरे यांनी २३ जानेवारी २०२० रोजी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकतात.