अमिताभ बच्चन Videos

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More