अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
गोपालनगर परिसरातील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा…
युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांनी स्वत:च्या प्रचार फलकांवर महायुतीच्या नेत्यांचे छायाचित्रे वापरल्याचा आक्षेप अभिजीत अडसूळ यांनी घेतला आहे.
सर्वच समाजघटकांचे सहकार्य मिळवण्याचा खोडके यांचा प्रयत्न प्रचारादरम्यान दिसून आला. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या आधारे त्यांनी मतदारांना आवाहन…