अभिनेत्री अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी अभिनेता चंकी पांडे आणि कॉस्च्युम डिझायनर भावना पांडे यांच्या घरी झाला. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अनन्याने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून केली. याशिवाय तिने त्याच वर्षी कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ मध्ये काम केले होते. या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिने २०२२मध्ये ‘गेहराईयां’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा बॉलिवूड पदार्पण चित्रपट ‘लायगर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. अनन्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. Read More
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींच्या घरीही गणपती बाप्पा आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा…