अनिल अंबानी News

अनिल अंबानी (Anil Ambani) हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. अनिल हे धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ आहे. अनिल अंबानी यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. हे भारतीय उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे (ऊर्फ रिलायन्स एडीए ग्रुप) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलगीकरणानंतर जुलै २००६ मध्ये रिलायन्स समूहाची निर्मिती करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स पॉवरसह अनेक स्टॉक्स लिस्टेड कॉर्पोरेशन्सचे मालकही आहेत. अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी; तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र, असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.


अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इनोव्हेंचर्स कंपनीला NCLT मध्ये आणून दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन फायनान्सर जेसी फ्लॉवर यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्जाची परतफेड न केल्यामुळे एनसीएलटीमध्ये ओढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकास्थित फायनान्सरकडे येस बँकेने ४८,००० कोटी रुपयांचे बुडीत कर्ज हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या कर्जाचाही समावेश होता.


अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने ९२२.५८ कोटी रुपयांच्या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. डीजीजीआयने कंपनीला नोटीस पाठवून कोट्यवधींच्या उत्पन्नावर जीएसटीची मागणी केली आहे. अनिल अंबानी संदर्भात सर्व बातम्या तुम्ही या सदरामध्ये वाचू शकता.


Read More
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

Anil Ambani Company Banned: सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अनिल अंबानींना मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स पॉवर आणि इतर कंपन्यांवर…

reliance Infra electric cars news
अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य

अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ईव्ही प्लांट निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाची तसेच एकूण व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती आहे.

sebi bans anil ambani from securities market
अग्रलेख : ‘अ’ ते ‘नी’!

प्रश्न नियामकाच्या जागण्याचा नाही. ते कधी जागतात आणि कधी झोपेचे सोंग घेऊन पहुडलेले राहतात, हा आहे…

Why did SEBI ban Anil Ambani from trading in the capital market for five years
‘सेबी’ने अनिल अंबानींवर भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी का घातली? प्रीमियम स्टोरी

अनिल अंबानी यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, कंपनीतील निधी त्यांच्याशी संबंधित सहयोगींना कर्ज म्हणून दिल्याचे दाखवणारी एक…

News About Anil Ambani
Anil Ambani : अनिल अंबानींवर सेबीची कारवाई, २५ कोटींचा दंड ठोठावत पाच वर्षांसाठी घातली बंदी

उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर सेबीने कारवाई केली आहे. पाच वर्षांसाठी त्यांच्यावर बंदीही घालण्यात आली आहे.

reliances mango empire how mukesh ambani transformed jamnagars barren lands to becomes worlds top exporte
मुकेश अंबानी आहेत देशातील सर्वांत मोठे आंबा बागायतदार; भारतातूनच नव्हे तर परदेशांतूनही करतात अब्जावधींची कमाई

Reliance Mango Orchard: यातून कृषी क्षेत्रातही अंबानी कुटुंबीयांचा दबदबा दिसून येत आहे.

Anant Ambani wedding gifted watches worth 2 crore rupees to these celebrities in wedding
Anant Ambani Wedding Gift: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात ‘या’ कलाकारांना दिली २ कोटींची भेटवस्तू; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच एवढ्या उत्साहात…”

Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने दिलेल्या या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Anant ambani radhika merchant wedding shahrukh khan will came back Mumbai to attend ambani wedding
Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी भारतात परतला शाहरुख खान, बॉलीवूडच्या किंग खानचा व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: शाहरुख खान याआधी न्यूयॉर्कमध्ये असल्याने अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना गैरहजर होता.