Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

अनिल अंबानी Photos

अनिल अंबानी (Anil Ambani) हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. अनिल हे धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ आहे. अनिल अंबानी यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. हे भारतीय उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे (ऊर्फ रिलायन्स एडीए ग्रुप) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलगीकरणानंतर जुलै २००६ मध्ये रिलायन्स समूहाची निर्मिती करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स पॉवरसह अनेक स्टॉक्स लिस्टेड कॉर्पोरेशन्सचे मालकही आहेत. अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी; तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र, असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.


अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इनोव्हेंचर्स कंपनीला NCLT मध्ये आणून दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन फायनान्सर जेसी फ्लॉवर यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्जाची परतफेड न केल्यामुळे एनसीएलटीमध्ये ओढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकास्थित फायनान्सरकडे येस बँकेने ४८,००० कोटी रुपयांचे बुडीत कर्ज हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या कर्जाचाही समावेश होता.


अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने ९२२.५८ कोटी रुपयांच्या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. डीजीजीआयने कंपनीला नोटीस पाठवून कोट्यवधींच्या उत्पन्नावर जीएसटीची मागणी केली आहे. अनिल अंबानी संदर्भात सर्व बातम्या तुम्ही या सदरामध्ये वाचू शकता.


Read More
Anant Radhika Wedding international guest list
10 Photos
Anant Ambani, Radhika Merchant Wedding: अनंत राधिकाच्या लग्नाला ‘या’ बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती? पाहा संपूर्ण यादी

Anant Radhika Wedding: अनंत राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी जगभरातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी भारतात आले होते. या यादीत कोणाकोणाचा समावेश आहे जाणून…

anil ambani tina ambani | Anil Ambani | Tina Ambani | anil ambani family, anil ambani net worth, anil ambani tina ambani sons | Anil Ambani daughter in law Khrisha Shah Jai Anmol Ambani Jai Anshul Ambani
15 Photos
५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

Anil Ambani Net Worth: मुकेश अंबानी यांचे धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यावर खूप कर्ज आहे. बिझनेसमध्ये प्रचंड नुकसान होऊन दिवाळखोरी…

Anant Ambani Watch Price Anant Ambani prewedding at jamnagar Pre Wedding Bash
9 Photos
बाबो! अनंत अंबानींच्या हातात लक्झरी घड्याळ, किंमत ऐकून थक्क व्हाल; या किंमतीत मुंबईत येईल सीफेस फ्लॅट

Anant Ambani prewedding: अनंत अंबानींच्या घड्याळाचीच चर्चा, किंमत इतकी की मुंबईत घ्याल सी फेसिंग घर

Neeta Mukesh Ambani Son Akash Anant Education How Educated Are Radhika Merchant & Shloka Mehta Isha Piramal Unknown Facts
9 Photos
मुकेश व नीता अंबानी यांच्या कुटुंबाचं शिक्षण किती? ‘ही’ सून आहे सर्वाधिक शिक्षित, तर लेक इशाने सुद्धा..

Neeta Mukesh Ambani Family Education: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व भावी सून राधिका मर्चंट सध्या…

dhirubhai ambani
9 Photos
Photo : बेताची परिस्थिती, पेट्रोलपंपावर केलं काम, १७ व्या वर्षापासून नोकरी करणाऱ्या धीरुभाई अंबानींनी कोट्यवधींचं साम्राज्य कसं उभं केलं?

धीरूभाई अंबानी हे भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक होते. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली, जी आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी…

Mukesh Ambani House Open For Visit in just Two Rupees For Late Father Dhirubhai Ambani Memorial House Watch Inside Ambani House Photos
9 Photos
फक्त २ रुपयात अंबानींचे घर तुम्हालाही आतून पाहता येणार; कसं ते जाणून घ्या

Ambani House Visit: तुम्हाला येथील एका गिफ्ट शॉप मधून अंबानी कुटुंबाशी संबंधित काही खास गोष्टी खरेदी करता येऊ शकतात.

Anil Ambani was richer than his brother Mukesh Ambani
8 Photos
काही वर्षांपूर्वी अनिल अंबानी होते मुकेश अंबानींपेक्षा श्रीमंत; आता त्यांच्याकडे उरली ‘इतकी’च संपत्ती

रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या…

supriya sule and tina ambani friendship
9 Photos
Photos: सुप्रिया सुळे या टीना अंबानीच्या खास मैत्रिणींपैकी एक; प्रत्येक प्रसंगी असतात सोबत, पाहा फोटो

Photos: सुप्रिया सुळे या टीना अंबानीच्या खास मैत्रिणींपैकी एक आहेत. त्या प्रत्येक प्रसंगी एकत्र दिसून येतात

ताज्या बातम्या