अनिल देशमुख Photos

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.


१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. १०० कोटी वसुलीप्रकरणात अनिल देशमुख बरेच महिने तुरुंगात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ केली.


Read More
Anil Deshmukh Sachin Waze Mukesh Ambani house
18 Photos
Photos : मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं ते सचिन वाझेने केलेले दोन खून, तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुख काय म्हणाले? वाचा…

मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी बुधवारी (२८ डिसेंबर) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे ते…

Money Laundering Jailed Anil Deshmukh asks court to take one day bail in Rajya Sabha elections
9 Photos
PHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं? वाचा…

अनिल देशमुखांना मिळालेल्या जामीनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

uddhav thackeray Sharad pawar Anil Deshmukh
18 Photos
“उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे १०० कोटी कसे वळवले जात होते हे अनिल देशमुख यांना…”

आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिल्यासंदर्भात बोलताना दिली.

ताज्या बातम्या