अनिल कपूर हे एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माते आहेत जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या करिकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूर यांनी १९७९ मध्ये ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. १९८३ च्या रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘वो सात दिन’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. १९८४ मध्ये ‘मशाल’ आणि ‘मेरी जंग’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनिल कपूर यांना भरपूर लोकप्रियता मिळाली. अनिल कपूर यांना “मिस्टर इंडिया” चित्रपटाच्या यशानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये त्यांनी त्यांची वहिनी श्रीदेवीसह काम केले. अभिनेता असण्याव्यतिरिक्त ते एक चित्रपट निर्माता देखील आहेत, आणि त्यांनी ‘बधाई हो बधाई’ आणि ‘गांधी, माय फादर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. बॉलिवूडशिवाय अनिल कपूर यांनी ‘स्लमडॉग मिलेनियर’ या ब्रिटिश चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाने चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आणि दहा ऑस्कर नामांकने मिळविली.Read More