अनिल कपूर Photos

अनिल कपूर हे एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माते आहेत जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या करिकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूर यांनी १९७९ मध्ये ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. १९८३ च्या रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘वो सात दिन’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. १९८४ मध्ये ‘मशाल’ आणि ‘मेरी जंग’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनिल कपूर यांना भरपूर लोकप्रियता मिळाली. अनिल कपूर यांना “मिस्टर इंडिया” चित्रपटाच्या यशानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये त्यांनी त्यांची वहिनी श्रीदेवीसह काम केले. अभिनेता असण्याव्यतिरिक्त ते एक चित्रपट निर्माता देखील आहेत, आणि त्यांनी ‘बधाई हो बधाई’ आणि ‘गांधी, माय फादर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. बॉलिवूडशिवाय अनिल कपूर यांनी ‘स्लमडॉग मिलेनियर’ या ब्रिटिश चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाने चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आणि दहा ऑस्कर नामांकने मिळविली.Read More
Anil Kapoor looks unrecognisable in this childhood pictures
9 Photos
गॅरेजमध्ये राहिला, चाळीमध्ये वाढला; ‘या’ अभिनेत्यानं संघर्षातून मिळवलं मोठं यश, आज आहे अब्जावधींची मालमत्ता

आज आपण त्या अभिनेत्याबद्दल जाणून घेऊयात जो आज बॉलीवूडचा मोठा स्टार आहे, पण एकेकाळी आर्थिक अडचणीत होता. त्याला संघर्षाच्या दिवसांत…

Juhi chawla,Anil kapoor
10 Photos
“जूही चावला ‘ते’ गाणं शूट करून धाय मोकलून रडत होती”, अनिल कपूरने सांगितला किस्सा; म्हणाला, “तिने रागाच्या भरात…”

अनिल कपूरबरोबर या गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर जूही बराच वेळ धाय मोकलून रडत होती.

flop movies hit on tv
8 Photos
चित्रपटगृहात आपटले, पण टीव्हीवर सुपरहिट ठरले ‘हे’ आठ चित्रपट

येथे अशा काही चित्रपटांची यादी देत आहोत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र हेच चित्रपट टीव्हीवर आल्यावर (वर्ल्ड…

1 Photos
अनिल कपूर ‘थार’मध्ये मुलगा हर्षवर्धनसोबत दिसणार; ‘या’ पिता-पुत्राची जोडी देखील पडद्यावर झळकलेली आहे

पाहा बॉलवूडमधील चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या आणखी काही पिता-पुत्राच्या जोड्या