अनिल कुंबळे News

अनिल कुंबळे (Anil Kumble) हे भारतीय क्रिकेटपटू आहेत. ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार देखील आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. १८ वर्षांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ते १३२ कसोटी सामने आणि २७१ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यांच्या इतिहासामध्ये भारताकडून खेळणाऱ्या सर्वात्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ गडी बाद केले आहेत, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी ३३७ बळी घेतले होते. १९९३ मध्ये त्यांची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. २०१६ ते २०१७ पर्यंत ते भारताच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.


अनिल कुंबळे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७० रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. लहान असताना त्यांना क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला होता. बी.एस.चंद्रशेखर सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ त्यांनी पाहिला होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनिल कुंबळे यांनी क्रिकेटला पूर्णपणे वेळ देण्याचा निर्णय घेतला. पुढे वयाच्या एकोणविसाव्या वर्षी त्यांना कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे त्यांना १९९० मध्ये ऑस्ट्रेलिया-आशिया कपसाठी त्यांची निवड झाली होती. त्याचवर्षी ऑगस्ट १९९० मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. या सामन्यापासून अनिल कुंबळे यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली. १९९० मध्येच ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय क्रिकेट खेळू लागले. अनिल कुंबळे हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी भारतीय फिरकी गोलंदाजांपैकी एक आहेत. ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. ३५ कसोटी सामन्यांमध्ये ५ बळी घेण्याचा, ८ कसोटी सामन्यांमध्ये १० बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ४०,८५० चेंडू टाकले आहेत. ७ फेब्रुवारी १९९९ रोजी दिल्लीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या कसोटी सामन्यामध्ये अनिल कुंबळे यांनी पाकिस्तानी संघाच्या सर्व खेळाडूंना बाद करत इतिहास रचला होता. याशिवाय २००२ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यामध्ये त्यांच्या जबड्याला दुखापत झाली होती. तेव्हा होणारा त्रास सहन करत अनिल यांनी त्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली होती.


४ जानेवारी २०१२ रोजी अनिल कुंबळे यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१२ ते २०१५ या सुमारास ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या संघाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून काम करत होते. २०१६ मध्ये त्यांची निवड भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी करण्यात आली. दरम्यानच्या काळात विराट कोहलीशी त्यांचे काही वेळेस मतभेद झाली. त्यानंतर २०१७ मध्ये ते प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.


Read More
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले

IND vs NZ Anil Kumble statement : भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्यामुळे…

Ravichandran Ashwin Breaks Anil Kumble Record of Most Test Wickets in Asia IND vs BAN
IND vs BAN: रविचंद्रन अश्विनच्या नावे ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेंचा ‘हा’ मोठा विक्रम मोडत ठरला नंबर वन

Ravichandran Ashwin IND vs BAN: भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. अश्विनने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिली विकेट…

IND vs BAN Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record
IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

IND vs BAN Ravichandran Ashwin Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळला जात आहे. या सामन्यात…

BCCI should give time to Gautam Gambhir Anil Kumble's reaction to the selection of India's head coach
“भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी…”, अनिल कुंबळेचे गौतम गंभीरच्या प्रशिक्षक होण्याच्या चर्चांवर मोठे वक्तव्य

Anil Kumble on Gautam Gambhir : अलीकडेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळे प्रशिक्षक…

anil kumble praise ravichandran ashwin for taking 500 test wickets
आव्हानांचा निडरपणे सामना केल्यानेच अश्विन यशस्वी! भारताचा माजी कर्णधार कुंबळेकडून स्तुती

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान अश्विनने ५०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडला.

anil kumble extended his stay in tadoba andhari tiger reserve to catch a glimpse of the tiger
Video : ‘छोटा मटका’ने दिली अनिल कुंबळेला हुलकावणी; अखेर परतीचा मार्ग स्वीकारला

क्रिकेटपटू अनिल कुंबळेने त्यांच्या ताडोबातील  सफारीची सुरुवातच बफर क्षेत्रातून केली. एरवी पर्यटक ताडोबाच्या गाभा क्षेत्रात पर्यटनाला पसंती देतात.

Pat Cummins Second Most Expensive Player In IPL
IPL 2024 Auction : पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी हैदराबादने २०.५ कोटी रुपये का खर्च केले? अनिल कुंबळेने सांगितले कारण

Anil Kumble Statement : विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन असे मानतो की कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाच्या अलीकडच्या यशाचे श्रेय…

Spending 25 crores on foreign players is madness Virat-Bumrah must also be watching said Anil Kumble
IPL 2024 Auction: कमिन्स, स्टार्कवर एवढी रक्कम खर्च केल्याबद्दल अनिल कुंबळेने नाराजी व्यक्त केली; म्हणाला, “ हा मूर्खपणा…”

IPL 2024 Auction, Anil Kumble: माजी कर्णधार आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाला की, “एखाद्या खेळाडूवर २०-२० कोटी…

IPL 2024 Auction: There should be a separate purse for foreign players Anil Kumble makes big statement on salary cap
IPL 2024 Auction: “परदेशी खेळाडूंसाठी वेगळी पर्स…”, अनिल कुंबळेने सॅलरी कॅपबाबत केले मोठे विधान

IPL 2024 Auction, Anil Kumble: आयपीएलमधील परदेशी खेळाडूंसाठीही पगाराचा सॅलरी कॅप निश्चित केली पाहिजे, असे मत माजी भारतीय खेळाडू अनिल…

RCB IPL 2024 auction uppdates
IPL Auction 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या रणनीतीवर माजी कर्णधाराने केले प्रश्न उपस्थित, सांगितली संघातील सर्वात मोठी कमतरता

Anil Kumble on RCB : आरसीबीने आयपीएल २०२४ च्या लिलावात काही नवीन खेळाडूंना संघात सामील करुन घेतले. लिलावापूर्वी या संघाने…