अनिल कुंबळे Videos

अनिल कुंबळे (Anil Kumble) हे भारतीय क्रिकेटपटू आहेत. ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार देखील आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. १८ वर्षांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ते १३२ कसोटी सामने आणि २७१ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यांच्या इतिहासामध्ये भारताकडून खेळणाऱ्या सर्वात्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ गडी बाद केले आहेत, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी ३३७ बळी घेतले होते. १९९३ मध्ये त्यांची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. २०१६ ते २०१७ पर्यंत ते भारताच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.


अनिल कुंबळे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७० रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. लहान असताना त्यांना क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला होता. बी.एस.चंद्रशेखर सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ त्यांनी पाहिला होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनिल कुंबळे यांनी क्रिकेटला पूर्णपणे वेळ देण्याचा निर्णय घेतला. पुढे वयाच्या एकोणविसाव्या वर्षी त्यांना कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे त्यांना १९९० मध्ये ऑस्ट्रेलिया-आशिया कपसाठी त्यांची निवड झाली होती. त्याचवर्षी ऑगस्ट १९९० मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. या सामन्यापासून अनिल कुंबळे यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली. १९९० मध्येच ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय क्रिकेट खेळू लागले. अनिल कुंबळे हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी भारतीय फिरकी गोलंदाजांपैकी एक आहेत. ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. ३५ कसोटी सामन्यांमध्ये ५ बळी घेण्याचा, ८ कसोटी सामन्यांमध्ये १० बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ४०,८५० चेंडू टाकले आहेत. ७ फेब्रुवारी १९९९ रोजी दिल्लीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या कसोटी सामन्यामध्ये अनिल कुंबळे यांनी पाकिस्तानी संघाच्या सर्व खेळाडूंना बाद करत इतिहास रचला होता. याशिवाय २००२ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यामध्ये त्यांच्या जबड्याला दुखापत झाली होती. तेव्हा होणारा त्रास सहन करत अनिल यांनी त्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली होती.


४ जानेवारी २०१२ रोजी अनिल कुंबळे यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१२ ते २०१५ या सुमारास ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या संघाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून काम करत होते. २०१६ मध्ये त्यांची निवड भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी करण्यात आली. दरम्यानच्या काळात विराट कोहलीशी त्यांचे काही वेळेस मतभेद झाली. त्यानंतर २०१७ मध्ये ते प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.


Read More

ताज्या बातम्या