अनिल परब Videos
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी अॅड. अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांची राजकीय ओळख आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना चारवेळा विधानपरिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. पालिका निवडणुकीच्या रणनीतीकारांपैकी ते एक आहेत.
२००१ मध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. दोन विभागांची एकाच वेळी जबाबदारी असणारे ते एकमेव नेते आहेत. वांद्रे ते अंधेरीपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. याशिवाय नुकत्यात पार पडलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे परिवहन खात्याचे मंत्रीपद होते. सप्टेंबर २०२१ मध्ये अनिल परब राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लाचखोरी आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अनिल परब यांना करोडोंची लाच मिळाल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.
Read More